टोयोटा इनोव्हा हायक्रॉस नव्या रूपात: 12.3 इंचाची स्क्रीन आणि भरपूर फीचर्स, 26 नोव्हेंबरला भारतात येण्याची
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
टोयोटाने आपली लोकप्रिय एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉस अपडेट केली आहे. केबिनमधले बदल, सुरक्षेची फीचर्स आणि इंडोनेशियातली किंमत यांबद्दल सविस्तर.
टोयोटाने आपली लोकप्रिय एमपीव्ही 'इनोव्हा हायक्रॉस' अपडेट केली आहे. इंडोनेशियात ही गाडी 'इनोव्हा जेनिक्स' या नावाने प्रसिद्ध आहे. इंडोनेशियात लॉन्चिंग झाल्यानंतर आता लवकरच ही कार नव्या आणि आकर्षक बदलांसह भारतीय बाजारातही दाखल होण्याची शक्यता आहे. या नव्या अपडेटमुळे कारमधला प्रवासाचा अनुभव अधिक आधुनिक आणि आरामदायी होणार आहे.
सगळ्यात मोठे बदल गाडीच्या आतल्या भागात, म्हणजे केबिनमध्ये करण्यात आले आहेत. हाइब्रिड व्हेरियंटमध्ये आता 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3 इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली आहे. काही व्हेरिएंट्समध्ये 10 इंचाची स्क्रीनही मिळते. ही स्क्रीन इन-कार वाय-फाय हॉटस्पॉट, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि एनएफसी ई-टोल यांसारख्या आधुनिक फीचर्सना सपोर्ट करते. मात्र काही जुनी फीचर्स, जसे की रियर सीट एन्टरटेन्मेंट आणि वायरलेस चार्जर, या अपडेटमध्ये काढून टाकली आहेत.
टॉप मॉडेल 'क्यू हायब्रिड मॉडेलिस्टा' मध्ये प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन अनेक प्रीमियम फीचर्स जोडली आहेत. यात इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल ड्राईव्हर सीट मिळते. तसेच दुसऱ्या रांगेत ओटोमन फीचरसह कॅप्टन सीट्स दिल्या आहेत.
सुरक्षेसाठी या मॉडेलमध्ये ड्युअल चॅनेल डॅश कॅम (DVR), 6 एअरबॅग्ज, टोयोटा सेफ्टी सेन्स (TSS), ब्लाईंड स्पॉट मॉनिटरिंग आणि 360 डिग्री पॅरोडामिक कॅमेरा दिला आहे. गाडीच्या बाहेरच्या बाजूलाही बदल आहेत. तिथे 18 इंचाचे आकर्षक अलॉय व्हील्स आणि फूट-जेस्चरने उघडणारी पॉवर टेलगेट सुविधा मिळते.
गाडीच्या मेकॅनिकल भागात मात्र कोणताही बदल केलेला नाही. आधीप्रमाणेच 2.0 लिटर, 4 सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉँग हायब्रिड सिस्टीमसोबत येते. इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने हे इंजिन एकूण 186 बीएचपी पॉवर तयार करते. गाडीत ई-सीव्हीटी गिअरबॉक्स असून इको, पॉवर आणि ईव्ही असे तीन ड्रायव्हिंग मोड्स मिळतात.
आता किंमतीबद्दल. इंडोनेशियात या अपडेटेड हाइब्रिड मॉडेलची सुरुवातीची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलसाठी ती 32 लाख रुपयांपर्यंत जाते. भारतीय बाजारात कंपनी हे फेसलिफ्ट मॉडेल येत्या 26 नोव्हेंबर रोजी सादर करू शकते, अशी ऑटो सेक्टरमध्ये जोरदार चर्चा आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.