ठाण्यात लेक शोअर येथे युनिक्लोचे पहिले दालन सुरू
जागतिक वस्त्रप्रावरण ब्रँड युनिक्लोने 16 ऑक्टोबर 2026 रोजी ठाण्यातील लेक शोअर येथे नवीन दालन सुरू केले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जागतिक स्तरावरील वस्त्रप्रावरण क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड युनिक्लोने ठाण्यातील लेक शोअर येथे आपले नवीन दालन सुरू केल्याची घोषणा केली आहे. 16 ऑक्टोबर 2026 रोजी ठाणे, भारत येथून ही घोषणा करण्यात आली. या दालनामुळे युनिक्लोने ठाणे शहरात पदार्पण केले आहे.
या नव्या दालनामुळे मुंबई महानगर प्रदेशातील युनिक्लोचे स्थान अधिक मजबूत होणार आहे. तसेच संपूर्ण भारतातील ग्राहकांना सेवा देण्याप्रती ब्रँडची सातत्यपूर्ण बांधिलकी यातून दिसून येते, असे सांगण्यात आले.
ठाणे हे तरुण आणि विविध ग्राहकवर्ग असलेले, वेगाने विकसित होणारे शहरी केंद्र आहे. सुमारे 18,000 चौ. फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या दालनात पुरुष, महिला आणि मुलांसाठी युनिक्लोची लाइफवेअर उत्पादनश्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दालनाची आधुनिक अंतर्गत रचना आणि युनिक्लोची वैशिष्ट्यपूर्ण दृश्यात्मक ओळख यांमुळे ग्राहकांना खरेदीचा सहज, आनंददायी आणि आकर्षक अनुभव मिळणार आहे.
युनिक्लो इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कामकाज अधिकारी केन्जी इनोउए म्हणाले, "ठाण्यातील लेक शोअर येथे आमचे नवीन दालन सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतभर युनिक्लोच्या सातत्यपूर्ण विस्ताराच्या प्रवासातील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ठाणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि शहरातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत लाइफवेअर पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. स्थानिक समुदायाचा एक भाग बनण्यासोबतच ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे आणि दैनंदिन जीवन अधिक समृद्ध करणारी उच्च दर्जाची, उपयुक्त आणि कार्यक्षम वस्त्रप्रावरणे उपलब्ध करून देण्याची आम्हाला अपेक्षा आहे."
उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या. रांगेतील पहिल्या 200 ग्राहकांना युनिक्लोची राउंड मिनी शोल्डर बॅग आणि थर्ड वेव्ह कॉफी देण्यात आली. याशिवाय 16 ऑक्टोबर रोजी 6,000 रु. किंवा त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही भेट म्हणून खास टोट बॅग देण्यात आली.
या स्टोअरमध्ये युनिक्लोचा 2026 चा फॉल/विंटर संग्रह उपलब्ध आहे. त्यात कॅज्युअल आऊटरवेअर, फ्लीस, निटवेअर, हीटटेक आणि पफटेक यांसारख्या त्या त्या हंगामानुसार उपयुक्त उत्पादनांचा समावेश आहे. आधुनिक शहरी जीवनशैलीसाठी दैनंदिन वापरात आराम, सहजता आणि विविध प्रकारे वापरण्याची सुविधा मिळावी, या दृष्टीने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत.
युनिक्लो आणि त्याच्या विविध उत्पादनसंग्रहांविषयी अधिक माहिती हवी असल्यास कंपनीच्या वेबसाइटला भेट द्यावी किंवा युनिक्लो इंडियाचे अधिकृत ॲप डाउनलोड करावे.