मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:30 IST

टाटा सन्स वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया, संवादातून तोडगा काढण्याचा सल्ला

एन चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवरुन टाटा सन्स संचालक मंडळ आणि टाटा ट्रस्टस मध्ये वाद, शरद पवारांनी एक्सवर मांडली भूमिका

टाटा सन्स वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया, संवादातून तोडगा काढण्याचा सल्ला
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवरुन आणि टाटा सन्सच्या आयपीओ प्रक्रियेवरुन टाटा सन्सचे संचालक मंडळ आणि टाटा ट्रस्टस यांच्यात मोठा वाद उभा राहिला आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली असून त्यांनी एक्स अकाउंटवरुन एक सविस्तर पत्र जाहीर केलं आहे.

टाटा ट्रस्टने दिलेल्या निवेदनानुसार कंपनीच्या नियमावलीतील (एओए) अटींनुसार ट्रस्टच्या नामनिर्देशित संचालकांचा बहुमताने पाठिंबा मिळणं बंधनकारक आहे. यात दोन संचालकांपैकी बहुमत म्हणजे दोघांची सहमती, एकट्याची नाही, असं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही अट पूर्ण झाली नसल्यानं संबंधित ठराव पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो, असं टाटा ट्रस्टचं म्हणणं आहे. बोर्डातील एकूण ४-१ हे मतदानही यामुळे निरर्थक ठरतं, कारण नियमावलीतील महत्त्वाच्या अटींची पूर्तता झालेली नाही. नोएल टाटा यांच्या विरोधामुळे कोणतीही कोंडी निर्माण झाली नसती, यावर अध्यक्षांच्या कास्टिंग व्होटचा वापर केला जाऊ शकतो, असंही निवेदनात नमूद आहे.

१७ सप्टेंबर रोजी झालेल्या टाटा सन्सच्या बोर्ड बैठकीत एन. चंद्रशेखरन यांना पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव ४-१ अशा बहुमतानं मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावाविरोधात टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी मत दिलं होतं. याच प्रस्तावावर शरद पवार यांनी आपलं मत मांडलं आहे. जमशेदजी टाटा, सर दोराबजी टाटा आणि पुढे सर रतन टाटा यांनी अतिशय मेहनतीने टाटा समूहाची उभारणी केली असून टाटा समूहाची मालकी एका व्यक्तीची नसून ती समाजाच्या हितासाठी उभी करण्यात आली आहे, असं पवार म्हणाले.

टाटा सन्सची ६६% भागीदारी लोककल्याणकारी ट्रस्टकडे असून त्यातून मिळणारा लाभ आरोग्य, शिक्षण आणि संशोधनासाठी वापरला जातो, याकडेही पवारांनी लक्ष वेधलं. त्यामुळे टाटा ट्रस्टची रचना आणि अधिकार अबाधित राखणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. टाटा समूहातील हा वाद कोर्टात जाण्याऐवजी संवादाच्या माध्यमातून सोडवला जावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

जमशेदजी टाटा आणि टाटा कुटुंबानं उद्योग क्षेत्राबरोबरच समाजसेवेची मूल्याधिष्ठित दिशा दिली असल्याचं पवार यांनी नमूद केलं. त्यामुळे टाटा ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आणि संस्थात्मक भूमिका जपली गेली पाहिजे, असं ते म्हणाले. टाटा समूहाच्या नेतृत्वाबाबत निर्णय घेताना संस्थात्मक प्रक्रिया आणि ट्रस्टच्या भूमिकेचा आदर राखणंही तितकंच गरजेचं आहे, कारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विकासाशी आणि समाजजीवनाशी निरंतर जोडलेला टाटा समूहाचा वारसा जपणं आवश्यक आहे, असं पवारांनी सांगितलं.

टाटा उद्योग समूहानं टाटा मेमोरियल हॉस्पिटल, TIFR, TISS यांसारख्या राष्ट्रीय संस्था महाराष्ट्रासाठी उभारल्या आहेत. या संस्थांची स्वायत्तता आणि संस्थात्मक मूल्ये लक्षात घेता, त्यांचं सामाजिक भान जपणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असं शरद पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवरील पत्रात नमूद केलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ