दुष्काळात १८० शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी, ४ कोटींच्या निधीला मंजुरी
राज्यातील १८० शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात पाठवले जाणार आहे. कृषी विभाग आणि कृषीमंत्री दत्तात्रय बरणे यांनी हा निर्णय घेतला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाने आणि कृषीमंत्री दत्तात्रय बरणे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १८० शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात पाठवले जाणार आहे.
या दौऱ्यासाठी राज्य सरकारने ४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. कृषी विभागाकडून या दौऱ्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. म्हणजेच ४ कोटी रुपये खर्च करून राज्यातील १८० शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. या दौऱ्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतमालाची निर्यात, विक्री आणि प्रक्रिया या गोष्टी जवळून अभ्यासता येतील.
शेतकऱ्यांची निवड कशी होणार, हेही ठरले आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून प्रत्येकी ५ शेतकरी निवडले जातील, म्हणजे एकूण १७० शेतकरी. उरलेले १० शेतकरी राज्यस्तरीय समितीमार्फत निवडले जाणार आहेत. अशा रीतीने एकूण १८० शेतकऱ्यांची निवड होईल.
परदेशात शेतकऱ्यांना नीट मार्गदर्शन मिळावे आणि तांत्रिक गोष्टी त्यांना समजून घेता याव्यात, यासाठी कृषी विभागाचे ९ अधिकारी या दौऱ्यात त्यांच्यासोबत असणार आहेत.
या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील गोष्टींचा अभ्यास करण्याची संधी देणे हा आहे. शेतीसाठी लागणारे आधुनिक कृषी तंत्रज्ञान कसे चालते, शेतीत कोणता बदल होतो आहे, भविष्यातील तांत्रिक अभ्यासाकडे कशी वाटचाल सुरू आहे, हे त्यांना पाहता येईल. शेतीसाठी तयार होणारी बाजारपेठ, शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा हमीभाव आणि शेतमालाची निर्यात कशी केली जाते, याचाही अभ्यास या दौऱ्यात शिकवला जाणार आहे.
याशिवाय शेतमालाची विक्री, साठवणूक व्यवस्थापन आणि अन्न प्रक्रिया उद्योग याचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
ऐन दुष्काळात १८० शेतकऱ्यांना परदेशी पाठवण्यासाठी ४ कोटी रुपये खर्च होणार असल्याने विरोधकांकडून काही प्रमाणात टीका होत आहे. हा खर्च अनाथाई आहे, असे विरोधकांचे मत आहे.
दुसरीकडे, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीचा आधार म्हणून दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही घेतला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.