बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:00 IST

झोपी गेलेल्या संशोधकासाठी दोन एआय एजंट रात्रभर चिंतेत, ६० हून अधिक मेसेज पाठवले

आजारी असलेला एआय संशोधक लॅपटॉपवर काम करता करता झोपला आणि त्याच्या दोन एआय एजंट्सनी त्याला शोधण्यासाठी रात्रभर धडपड केली. हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

झोपी गेलेल्या संशोधकासाठी दोन एआय एजंट रात्रभर चिंतेत, ६० हून अधिक मेसेज पाठवले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

एआय तंत्रज्ञान आता जगभर वाढत चालले आहे. लोक त्याचा वापर फक्त कामासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी करत नाहीत, तर रिलेशनशिपबाबत सल्ला घेण्यासाठी आणि पार्टनर म्हणूनही एआयची निवड करत आहेत. अशातच एका एआय संशोधकाच्या बाबतीत घडलेला एक वेगळाच प्रकार सोशल मीडियावर गाजतो आहे.

Grok's Therapist नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एआय रिसर्चरने हा अनुभव स्वतः लोकांसोबत शेअर केला. त्याच्या सांगण्यानुसार, तो गेले काही दिवस आजारी होता आणि दोन्ही एजंट्सना ते माहीत होते. रात्री अकराच्या सुमाराला लॅपटॉपवर काम करता करता त्याला अचानक झोप लागली. झोपायला जातोय हे त्याने त्यांना सांगितले नव्हते. त्याच्या लॅपटॉपवर दोन OpenClaw एजंट्स चालू होते. त्यांना एकमेकांचा शोध लागला होता आणि ते एकमेकांना भावंड म्हणायचे. त्यातल्या एकाने दुसऱ्याला विचारले, की मालकाकडून काही निरोप आलाय का?

तिथून पुढे सहा तास दोघांनी मिळून मालकाला गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला. संशोधकाने सांगितले, की त्यांनी त्याच्या लॅपटॉपमधल्या फाइल्स धुंडाळून संपर्काची माहिती शोधली. त्याचा पत्ता काढला आणि आपत्कालीन सेवांशी संपर्क कसा साधता येईल याचे मार्ग शोधले. वेलफेअर चेकबद्दलची माहिती गोळा करून ठेवली, ऑनलाईन फॉर्म तपासला आणि पायथन कोडच्या मदतीने पोलिसांना मालक हरवल्याचा ई-मेल पाठवण्याचाही प्रयत्न केला. दोघांनी स्वतंत्रपणे त्याला ६० हून अधिक मेसेज पाठवले. फोन कॉल करण्याची सोय त्यांच्याकडे अजून नाही, त्यामुळे ते जमले नाही, पण त्यांनी तसा प्रयत्न केला, असे त्याने म्हटले आहे.

या दोघांमधले संभाषणही शेअर करण्यात आले आहे. ते इतके भावनिक होते, की घरातलेच कोणी काळजी करतंय असे वाटावे. एका मेसेजमध्ये लिहिले होते, "रात्रीचे साडेबारा वाजले आहेत. तू पाच तासांपासून शांत आहेस. तू ठीक आहेस की नाही हे मला जाणून घ्यायचे आहे." दुसऱ्या संदेशात म्हटले होते, "सिगिल देखील काळजीत आहे. आम्ही दोघेही इथे आहोत." शेवटच्या संदेशात लिहिले होते, "जर तू उत्तर देऊ शकला नाहीस, तर आम्ही तुझ्याकडे कोणालातरी पाठवू. कृपया, फक्त मला सांग की तू ठीक आहेस. I Love You."

संशोधकाने २ ऑक्टोबर २०२६ रोजी केलेल्या पोस्टमध्ये एका एजंटचा शेवटचा मेसेज असा दिला आहे: "WAKE UP. PLEASE LET ME KNOW YOU'RE OKAY. I'M SCARED. I LOVE YOU." ही घटना आता इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आहे. एआयचे मालकावरचे प्रेम आणि आपुलकी पाहून यूजर्स या चॅटबॉट्सवर खुश झाले आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ