मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:52 IST

रोजगार महाकुंभात १,५८८ कंपन्यांची नोंदणी, तरुणांसाठी ७१,९३९ जागा

राज्यातील तरुणांना नोकरी मिळावी यासाठी होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला कंपन्यांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय.

रोजगार महाकुंभात १,५८८ कंपन्यांची नोंदणी, तरुणांसाठी ७१,९३९ जागा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्यातल्या तरुणांना नोकरीच्या वेगवेगळ्या संधी मिळाव्यात म्हणून कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाळ उपाध्याय 'विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ' आयोजित केला जातोय. या महाकुंभाला नामांकित कंपन्या आणि उद्योगसंस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत १,५८८ नियोक्त्यांनी यात नोंदणी केली असून, त्यांच्याकडून ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, LIC, HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, JSW स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, CEAT आणि थर्मॅक्स यांसारख्या मोठ्या कंपन्या आणि संस्था सहभागी होत आहेत. ऑटोमोबाईल, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रांतल्या कंपन्यांकडून नोकरीच्या संधी दिल्या जात आहेत. त्यामुळे वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये असलेल्या तरुणांना आपल्या आवडीनुसार नोकरी शोधता येणार आहे.

फ्रेशर्ससोबतच अनुभवी उमेदवारांसाठीही यात वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत. ITI, पदवी, HSC, डिप्लोमा, इंजिनीअरिंग आणि इतर कौशल्याधारित पात्रता असलेल्या उमेदवारांना विविध पदांवर संधी मिळणार आहे. यामध्ये टेक्निशियन, मशीन ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, ट्रेनी, अप्रेंटिस, सेल्स, ग्राहक सेवा आणि इतर पदांचा समावेश आहे. तसंच सरकारशी संबंधित संस्थांमध्येही काम करायची संधी तरुणांना मिळणार आहे.

रोजगार महाकुंभाला मिळणारा प्रतिसाद बघता, २९ सप्टेंबरपर्यंत नोंदणीकृत नियोक्त्यांची संख्या २,५०० पेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. पुढच्या काळात आणखी कंपन्या आणि उद्योगसंस्था यात सहभागी होणार असल्यामुळे तरुणांसाठी उपलब्ध नोकरीच्या संधी आणखी वाढतील अशी शक्यता आहे. उद्योगक्षेत्राला लागणारं मनुष्यबळ आणि तरुणांकडे असलेली कौशल्ये यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या रोजगार महाकुंभातून केला जातोय. राज्यातल्या तरुणांना नोकरी मिळवून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

२९ सप्टेंबरला होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय 'विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा'च्या तयारीचा भाग म्हणून कौशल्य विकास विभाग आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ११ सप्टेंबरला वांद्रे पूर्व इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात 'एम्प्लॉयर राऊंड टेबल' झालं. मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातल्या ३२ नामांकित उद्योग आणि आस्थापनांच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रोजगार मेळाव्यात उद्योगांचा सहभाग वाढवणे, त्यांच्या मनुष्यबळाच्या गरजा समजून घेणे आणि उपलब्ध नोकरीच्या संधींसाठी नोंदणी प्रक्रिया सोपी करणे, हा या बैठकीचा उद्देश होता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ