मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:24 IST

'संताप' गाणे ठरतेय Gen Z चा आवाज; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि एमिनेमची प्रेरणा, रॅपर Vishay

रॅपर विषय खोल (Vishay Khxl) याचे 'संताप' हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. शिक्षणव्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा संदेश या रॅपमधून देण्यात आला आहे.

'संताप' गाणे ठरतेय Gen Z चा आवाज; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि एमिनेमची प्रेरणा, रॅपर Vishay
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

आजच्या Gen Z पिढीच्या मनात असलेले प्रश्न, अस्वस्थता आणि सामाजिक वास्तवाबद्दलचा आक्रोश रॅपच्या माध्यमातून मांडणारा रॅपर विषय खोल (Vishay Khxl) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे 'संताप' हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

शिक्षणव्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा संदेश या गाण्यात देण्यात आला आहे. तरुणाईच्या मनातल्या भावना थेट आणि परखड शब्दांत मांडल्या गेल्यामुळे या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या गाण्यामागे केवळ संगीताची प्रेरणा नाही, तर सामाजिक परिस्थितीबद्दलचा तीव्र आक्रोश आहे. जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी चांगल्या शिक्षणव्यवस्थेसाठी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळे विषय अस्वस्थ झाला. देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, आंदोलनादरम्यान झालेला अन्याय आणि महिला विद्यार्थिनींच्या अपमानाच्या घटना, यामुळे त्याच्या मनात संताप निर्माण झाला. तोच संताप त्याने रॅपमधून व्यक्त केला आहे. या संपूर्ण अनुभवातून 'संताप' हे गाणे तयार झाले.

विषयच्या संगीतप्रवासामागे एमिनेमचा मोठा प्रभाव आहे. आपल्या पहिल्या फोनमध्ये फक्त एमिनेमची गाणी होती, असे सांगताना तो म्हणतो, "माझ्या लिखाणात, रॅपिंग सेन्समध्ये, म्युझिक सेन्समध्ये, फ्लोज आणि केडन्समध्ये एमिनेमने मला खूप प्रेरणा दिली."

मात्र त्याचा प्रवास थेट रॅपर म्हणून सुरू झालेला नाही. "मी आधी म्युझिक प्रोड्युसर आहे आणि नंतर रॅपर," असे तो सांगतो. त्याने बीट्स तयार करण्यापासून संगीताची सुरुवात केली. विशेष म्हणजे संगीताशी कोणताही संबंध नसलेल्या एका मित्राकडे MPC किट असल्याचे त्याला एकदा स्वप्नात दिसले. त्या स्वप्नातल्या अनुभवामुळे त्याच्या मनात बीट मेकिंगबद्दल उत्सुकता निर्माण झाली. पुढे म्युझिक प्रोडक्शनमधून त्याचा रॅपकडे प्रवास सुरू झाला.

आपल्या भूमिकेबद्दल विषय स्पष्टपणे बोलतो. "आपल्या आजूबाजूला चुकीच्या गोष्टी आणि अन्याय घडत असताना आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. जिथे चुकीचं दिसतं, जिथे अन्याय दिसतो, तिथे आवाज उठवला पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही," असा स्पष्ट संदेश रॅपर विषय देतो.

त्यामुळे 'संताप' हे केवळ एक रॅप साँग न राहता Gen Z च्या प्रश्नांना, त्यांच्या अस्वस्थतेला आणि सामाजिक जाणिवेला आवाज देणारा ट्रॅक ठरत आहे. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद पाहता, विषयच्या या परखड रॅपची चर्चा येत्या काळात आणखी रंगण्याची शक्यता आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ