बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:48 IST

आंबेगाव बुद्रुकमध्ये संगणक नसल्याने महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा रद्द, विद्यार्थिनी केंद्राबाहेरच

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सण ब्राईट स्कूल या केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्याने महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा रद्द करावी लागली. वेळेत पोहोचूनही विद्यार्थिनींना परीक्षा देता आली नाही.

आंबेगाव बुद्रुकमध्ये संगणक नसल्याने महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा रद्द, विद्यार्थिनी केंद्राबाहेरच छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा रद्द करावी लागली. या परीक्षेसाठी सण ब्राईट स्कूल हे केंद्र ठरवण्यात आले होते. पण तिथे परीक्षेसाठी लागणारे संगणक उपलब्ध नव्हते, त्यामुळे परीक्षा घेता आली नाही, अशी माहिती समोर आली आहे. देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही परीक्षा आज सकाळी ९ ते ११ या वेळेत घ्यायची होती. विद्यार्थिनी ठरलेल्या वेळेत केंद्रावर पोहोचल्या. पण परीक्षा सुरू होण्याची वेळ उलटून गेली तरी पेपर सुरू झाला नाही. केंद्रावर संगणक नसल्याचे सांगण्यात आले आणि विद्यार्थिनींना परीक्षा देण्याची संधीच मिळाली नाही.

सकाळी ९ वाजता परीक्षा सुरू होणे अपेक्षित होते. तरीही बराच वेळ विद्यार्थिनी केंद्राबाहेरच उभ्या होत्या. परीक्षा आता कधी होणार आणि पुन्हा संधी मिळणार का, याबद्दल काहीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे केंद्रावर गोंधळाचे वातावरण झाले होते. वेळेत पोहोचूनही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये नाराजी आहे.

या स्कॉलरशिप परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अनेक दिवस मेहनत घेतली होती. अभ्यास, प्रवास आणि परीक्षेची तयारी यासाठी त्यांनी वेळ आणि पैसा खर्च केला होता आणि ते केंद्रावर पोहोचले होते. फक्त केंद्रावर संगणक नसल्याने परीक्षा रद्द झाली आणि त्यांच्या तयारीवर पाणी फिरले. संबंधित यंत्रणेने या प्रकाराची जबाबदारी निश्चित करावी आणि पुढची परीक्षा कधी आहे, याची स्पष्ट माहिती विद्यार्थ्यांना तातडीने द्यावी, अशी मागणी होत आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसली होती.

आता पुण्यात केंद्रावर संगणक नसल्याने परीक्षा रद्द झाल्याच्या प्रकारामुळे परीक्षेचे आयोजन आणि व्यवस्थापन यांच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ