मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

पितृपक्षातील जेवणासाठी पारंपरिक विदर्भ स्पेशल कढी, पाहा सोपी रेसिपी

विदर्भात पितृपक्षाच्या जेवणात हळद न घालता पांढऱ्या रंगाची खास कढी बनवण्याची परंपरा आहे. त्याची कृती येथे दिली आहे.

पितृपक्षातील जेवणासाठी पारंपरिक विदर्भ स्पेशल कढी, पाहा सोपी रेसिपी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये पितृपक्षाला विशेष महत्व आहे. या दिवसांमध्ये पितरांचे श्राद्ध घातले जाते आणि घरात सात्विक आणि पारंपरिक पदार्थ बनवले जातात.

महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये पितृपक्षाच्या जेवणात विविध पारंपरिक पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पांढऱ्या रंगाची कढी. जेवणाची चव वाढवण्यासाठी ही कढी हटके पद्धतीने बनवली जाते. या कढीमध्ये हळदीचा अजिबात वापर केला जात नाही.

बेसनाची किंवा साध्या दह्याची कढी सगळ्यांनी खाल्ली असेल. पण या पद्धतीने बनवलेली कढी चवीला अतिशय सुंदर लागते. मसाल्यांमुळे कढीला एक वेगळाच सुंदर रंग आणि चव येते. त्यामुळे ही विदर्भ स्पेशल कढी फक्त पितृपक्षातच नाही, तर इतर वेळीसुद्धा जेवणात बनवता येते. गरमागरम भात आणि ही कढी चवीला अतिशय सुंदर लागेल आणि जेवणात चार घास जास्त जातील. चला तर मग, ही सोपी रेसिपी घरच्या घरी कशी करायची ते जाणून घेऊया.

साहित्य: या कढीसाठी दही, बेसन, तूप, खडे मसाले, नागवेलीची पाने, शेंगदाणे, लसूण, आलं, पाणी, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर आणि जिरं लागते.

कृती: पारंपरिक पद्धतीने विदर्भ स्पेशल कढी बनवण्यासाठी सर्वात आधी भांड्यामध्ये ताजे दही घ्या. त्यात थोडंसं पाणी घालून दही चांगले फेटून घ्या. फेटलेल्या दह्यामध्ये १ किंवा २ चमचे बेसन घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. पिठाच्या अजिबात गुठल्या ठेवू नयेत.

त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आलं, जिरं, दगडफूल, नागवेलीची पाने आणि शेंगदाणे घालून बारीक वाटण करून घ्या. गरज वाटल्यास त्यात थोडं पाणी घालावे.

आता कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात लवंग आणि जिरं घालून फोडणी भाजा. मग त्यात तयार केलेले वाटण आणि दही घालून लगेच झाकण ठेवा आणि धुरकट फोडणी करा. यामुळे पदार्थाला पारंपरिक चव येईल.

सगळ्यात शेवटी कढीमध्ये कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. कढीला एक उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करा. अशा प्रकारे कढी खाण्यासाठी तयार होईल. ही आंबट-तिखट चवीची विदर्भ स्पेशल कढी आता वाढायला तयार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ