पीआय इंडस्ट्रीजने आणला पायॉक्सानिलीप्रोल, भारतात शोधलेला पहिला कीटकनाशक रेणू
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पीआय इंडस्ट्रीजने पायॉक्सानिलीप्रोल हा पूर्णपणे भारतातील संशोधनातून तयार झालेला कीटकनाशक रेणू आज बाजारात आणला.
पीआय इंडस्ट्रीजने आज पायॉक्सानिलीप्रोल हा कीटकनाशक रेणू लाँच केला. भारतात पूर्णपणे स्वदेशी संशोधनातून शोधला गेलेला हा देशातील पहिला कीटकनाशक रेणू आहे. एका दशकाहून अधिक काळ चाललेले मूळ संशोधन, सातत्याने केलेली गुंतवणूक आणि वैज्ञानिक नवकल्पना यातून तो विकसित झाला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे यश पीआयसाठी आणि भारताच्या पीक संरक्षण उद्योगासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. देश नवे वैज्ञानिक शोध लावू शकतो आणि स्वतःची बौद्धिक संपदा तयार करू शकतो, ही वाढती क्षमता यातून दिसते. भारतात वेगवेगळी पिके, वेगवेगळ्या कृषी-हवामान परिस्थिती आणि किटकांचा बदलता प्रादुर्भाव आहे, त्यामुळे ही जगातील सर्वात मोठी आणि वैविध्यपूर्ण कृषी परिसंस्था आहे. आठ दशकांहून अधिक काळ पीआयने भारतीय कृषी विद्यापीठे आणि शास्त्रज्ञांसोबत काम केले आहे. शेतकऱ्यांशी पिढ्यान्पिढ्या असलेल्या संपर्कातून या गुंतागुंतीची सखोल समज तयार झाली आहे.
ही समज आणि पीआयची प्रगत वैज्ञानिक शोधक्षमता, या दोन्हींचा मेळ पायॉक्सानिलीप्रोलमध्ये घातला गेला आहे. जागतिक वैज्ञानिक मानकांनुसार हा रेणू विकसित झाला आहे. भारतातील शेतीच्या परिस्थितीनुसार त्याचे सखोल मूल्यांकनही झाले आहे. त्यात राज्य कृषी विद्यापीठांसह भारताच्या कृषी संशोधन परिसंस्थेच्या सहभागाने विविध ठिकाणी शेतातील चाचण्या, वैज्ञानिक मूल्यमापने आणि नियामक अभ्यास झाले.
भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीकडून (सीआयबीअँडआरसी) पायॉक्सानिलीप्रोलला नोंदणी मिळाली आहे. भारतात शोधला गेलेला पहिला कीटकनाशक सक्रिय घटक म्हणून समितीने या रेणूला अधिकृत मान्यता दिली आहे.
पीआय इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्हाइस चेअरपर्सन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मयंक सिंघाल म्हणाले, "दशकभरापूर्वी आम्ही भारतात मूळ पीक-संरक्षण उपायांचा शोध घेण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यासाठी पारंपारिक समजुतींना आव्हान देण्याचे धाडस, मोठी दीर्घकालीन गुंतवणूक आणि यापूर्वी कधीही साध्य झाले नव्हते ते साध्य करण्याचा ठाम विश्वास आवश्यक होता. आज पायॉक्सानिलीप्रोल सिद्ध करते की, भारतातील शेतीविषयी आमची सखोल समज आणि जागतिक दर्जाचे विज्ञान यांचा संगम होतो, तेव्हा काय शक्य होऊ शकते." ते पुढे म्हणाले, "हा पीआयसाठी आणि भारतीय कृषी नाविन्यतांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हे यश भारतामधून जगासाठी मूळ विज्ञान आणि बौद्धिक संपदा निर्माण करणारी जागतिक, नाविन्यता-केंद्रित लाइफ सायन्सेस कंपनी उभारण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेला अधिक पाठबळ देते."
हा शोध म्हणजे मॉलिक्युलर डिस्कव्हरी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, फॉर्म्युलेशन सायन्स, टॉक्सिकॉलॉजी, अॅग्रोनॉमी, प्रोसेस डेव्हलपमेंट आणि उत्पादन या क्षेत्रांत पसरलेल्या एकात्मिक संशोधन आणि विकास परिसंस्थेत पीआयने केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीचे फळ आहे. ७०० हून अधिक शास्त्रज्ञ, २०० हून अधिक पीएचडी धारक आणि २६० हून अधिक पेटंट्सचा पोर्टफोलिओ यांच्या जोरावर मूळ शोध विकसित करण्यासाठी आणि त्यांचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी लागणारी वैज्ञानिक सखोलता व पायाभूत सुविधा पीआयने उभारल्या आहेत.
पायॉक्सानिलीप्रोलचे महत्त्व फक्त एका रेणूपुरते मर्यादित नाही. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि बायोकेमिकल उपायांचा समावेश असलेल्या पीआयच्या व्यापक इनोव्हेशन पाइपलाइनचा हा पहिला परिणाम आहे. भारताच्या वैज्ञानिक स्वावलंबनाच्या प्रवासातील हे महत्त्वाचे पाऊल असून स्वदेशी संशोधनक्षमता अधिक मजबूत होते, तसेच जागतिक आव्हानांना तोंड देण्याची संधी भारतीय कृषी नाविन्यतांना मिळते.
पीआय इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन नारायण के. शेषाद्री म्हणाले, "पायॉक्सानिलीप्रोल भारतीय कृषी विज्ञानाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रकारच्या क्रांतिकारी नाविन्यतेसाठी प्रस्थापित चौकटीच्या पलीकडे विचार करण्याची क्षमता, वैज्ञानिक सामर्थ्याची जोड, संयमी गुंतवणूक आणि दीर्घकालीन कटिबद्धतेची गरज असते. पीआय इंडस्ट्रीजसाठी पायॉक्सानिलीप्रोल नेक्स्ट-जनरेशन शोधांसाठी प्रबळ पाया ठरले आहे. हे सातत्यपूर्ण इनोव्हेशन पाइपलाइन उभारण्यासाठी, स्वदेशी संशोधन क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आणि जागतिक कृषी क्षेत्रासाठी वेगळेपण जपणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते."
भारतातील पहिल्या स्वदेशी कीटकनाशक शोधापासून भविष्यातील शोधांपर्यंत, पायॉक्सानिलीप्रोल पीआयसाठी आणि भारतीय कृषी नाविन्यतांसाठी नवे पर्व सुरू करत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.