पेप्सिको इंडिया: 70 टक्क्यांहून अधिक पेये झिरो शुगर किंवा मध्यम कॅलरीची, स्नॅक्समध्ये ज्वारी पफ्स
पेप्सिको इंडिया भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार पेये आणि खाद्यपदार्थांमध्ये बदल करत असून, चव कायम ठेवून अधिक आरोग्यदायी पर्याय वाढवत आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पेप्सिको इंडिया आपल्या खाद्यपदार्थ आणि पेय व्यवसायाचा विस्तार करत असताना, भारतातील ग्राहकांच्या बदलत्या आणि अधिक जागरूक होत चाललेल्या गरजा लक्षात घेऊन उत्पादनांमध्ये बदल करत आहे. ग्राहकांना आवडणारी चव तशीच ठेवायची, पण आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबद्दलची वाढती जागरूकता लक्षात घेऊन अधिक आरोग्यदायी पर्याय वाढवायचे, असा कंपनीचा भर आहे.
यासाठी उत्पादनांच्या घटकांमध्ये बदल केले जात आहेत, नवीन उत्पादने आणि प्रकार बाजारात आणले जात आहेत, तसेच वेगवेगळ्या घटकांचा वापर वाढवला जात आहे. उत्पादनांमधील पोषणमूल्ये आणि इतर वैशिष्ट्यांबाबत अधिक पारदर्शकता ठेवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त पर्याय मिळतात आणि आपल्या आवडीनिवडीनुसार आणि कधी सेवन करायचे आहे त्यानुसार योग्य उत्पादन निवडण्यासाठी लागणारी माहितीही मिळते.
पेय व्यवसायात कंपनीने कमी आणि मध्यम कॅलरी असलेल्या पेयांचे पर्याय वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाची प्रगती केली आहे. सध्या कंपनीच्या एकूण पेय उत्पादनांपैकी 70 टक्क्यांहून अधिक उत्पादने झिरो शुगर किंवा मध्यम कॅलरी असलेली आहेत. येत्या काळात हे प्रमाण टप्प्याटप्प्याने 90 ते 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी घटकांमध्ये आवश्यक बदल करण्यासोबतच कमी आणि झिरो शुगर असलेल्या पेयांचे पर्याय वाढवण्यावर भर आहे. यात पेप्सी ब्लॅक, 7अप झिरो शुगर, गेटोरेड झिरो आणि निंबूझ यांचा समावेश आहे.
खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात पोषणमूल्ये, वेगवेगळे घटक आणि तयारीच्या नव्या पद्धती यांच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना अधिक पर्याय देत आहे. 2026 मध्ये क्वेकर ब्रँडमध्ये नव्याने बदल करण्यात आले असून, त्यातील प्रथिने, फायबर आणि संपूर्ण धान्यांचे गुणधर्म ग्राहकांसमोर अधिक ठळकपणे मांडण्यात आले आहेत. आरोग्यदायी पर्यायांच्या श्रेणीत रेड रॉक डेलीच्या बेक्ड प्रकारांचा समावेश आहे, ज्यामध्ये 40 टक्के कमी चरबी आहे.
भारताच्या कृषी परंपरेचा गौरव करणारा भरडधान्यावर आधारित कुरकुरे ज्वारी पफ्स हा नवा पर्यायही सादर करण्यात आला आहे. ग्राहकांच्या वेगवेगळ्या चवी, आवडीनिवडी आणि जीवनशैलीला साजेसे अधिक पर्याय देण्याच्या पेप्सिकोच्या व्यापक प्रयत्नांचा हे प्रयोग एक भाग आहेत. लेज, कुरकुरे, डोरिटोस, चीटोज, अंकल चिप्स, क्वेकर आणि रेड रॉक डेली यांसह कंपनीच्या सर्व ब्रँडमधील रेडी-टू-ईट खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम स्वाद किंवा रंगांचा वापर केला जात नाही.
पारदर्शकतेलाही या वाटचालीत महत्त्वाचे स्थान आहे. पेप्सिको इंडिया आपल्या उत्पादनांच्या पॅकेटवर पोषणमूल्यांची माहिती देते. त्यात ऊर्जा, एका वेळी सेवन करण्याचे प्रमाण आणि महत्त्वाच्या पोषक घटकांच्या शिफारस केलेल्या दैनंदिन आहारातील गरजेच्या तुलनेत असलेले योगदान यांचा समावेश आहे.
पेप्सिको इंडिया आणि दक्षिण आशियाच्या चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर आणि सस्टेनेबिलिटी हेड यशिका सिंह म्हणतात, "पेप्सिको इंडियामध्ये आम्हाला विश्वास आहे की, ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी समजून घेणे आणि त्यांच्या विविध गरजा ओळखणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांना आरोग्यदायी पर्याय निवडणे सोपे करून देणे ही केवळ आमची जबाबदारी नसून, नवकल्पना आणि व्यवसायाच्या वाढीचा अविभाज्य भाग आहे. आमच्या ब्रँडच्या माध्यमातून लोकांना विचारपूर्वक निवडी करण्यासाठी सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे."
यशिका सिंह यांनी पुढे म्हटले, "कमी आणि झिरो शुगर असलेल्या पेयांपासून ते संपूर्ण धान्ये आणि भरडधान्यांसारख्या विविध घटकांपासून तयार केलेल्या स्नॅक्सपर्यंत, आम्ही ग्राहकांसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देत आहोत. आपल्या निवडींबाबत अधिक जागरूक होत असलेल्या ग्राहकांना हे पर्याय उपयुक्त ठरतील. त्याचवेळी, उत्पादनांची चव आणि त्यातून मिळणारा आनंद यांना आम्ही प्राधान्य देत आहोत. एकूणच, ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे आणि भारतातील विविध खाद्यसंस्कृती व पेयांच्या सवयी प्रतिबिंबित करणारे अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून देणे, हाच आमचा प्रयत्न आहे."
या सर्व उपक्रमांतून ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून उत्पादनांमध्ये बदल करण्याचा पेप्सिको इंडियाचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या चवी, जीवनशैली आणि वेगवेगळ्या प्रसंगांनुसार कंपनी सध्याच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करत असून, त्यांच्यासाठी नवे पर्यायही उपलब्ध करून देत आहे.