शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
08:52 IST

दीड हजारांच्या आत पाच ईअरबड्स: बोट, नॉइज आणि बाउल्टचे पर्याय

सणासुदीत भेट देण्यासाठी १,५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे बोट, नॉइज आणि बाउल्टचे पाच वायरलेस ईअरबड्स.

दीड हजारांच्या आत पाच ईअरबड्स: बोट, नॉइज आणि बाउल्टचे पर्याय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सणासुदीच्या काळात जवळच्या माणसांना काहीतरी खास भेट द्यायची असेल, तर १,५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत पाच वायरलेस ईअरबड्सचे पर्याय उपलब्ध आहेत. सतत फोनवर बोलणाऱ्या मित्रांसाठी वायरलेस ईअरबड्स निवडता येतील. यात बोट, नॉइज आणि बाउल्ट या कंपन्यांचे ईअरबड्स आहेत.

बोट एअरडोप्स प्राइम ८००डी या ईअरबड्सची किंमत १,३९९ रुपये आहे. यात उत्तम साउंड आणि इमर्सिव्ह लिसनिंगचा अनुभव मिळणार आहे. डॉल्बी ऑडिओ, ११ मिमी ड्रायव्हर्स, हायफाय डीएसपी कोअर आणि २४-बिट स्पेशियल ऑडिओ ही फीचर्स त्यात आहेत. एकूण ४५ तासांपर्यंतचा प्लेबॅक कंपनी देते. कॉलिंगसाठी एआय ईएनएक्स तंत्रज्ञानासह चार मायक्रोफोन्स आहेत, तर गेमिंगसाठी ४५ मिलीसेकंद लो लेटन्सीसह बीस्ट मोड आहे. एएसएपी चार्ज फीचरमुळे केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये चार तास प्लेबॅक मिळतो. ब्लूटूथ ६.१, आयपीएक्स५ वॉटर रेझिस्टन्स, गूगल फास्ट पेअर, मल्टिपॉइंट कनेक्टिव्हिटी आणि इन-इअर डिटेक्शनही दिले आहे.

बजेट १ हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर बोट एअरडोप्स प्लस २२३ घेता येतील. त्यांची किंमत ९९९ रुपये आहे. यात ६० तासांपर्यंतचा प्लेबॅक, १३ मिमी ड्रायव्हर्स आणि अधिक प्रभावी ऑडिओ अनुभवासाठी बोट स्पेशल ऑडिओ दिला आहे. कॉलिंगचा अनुभव चांगला व्हावा म्हणून एआय ईएनएक्स तंत्रज्ञानासह दोन मायक्रोफोन्स आहेत, तर गेमिंगसाठी ५५ मिलीसेकंद लो लेटन्सीसह बीस्ट मोड आहे. १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १५० मिनिटांपर्यंतचा प्लेबॅक एएसएपी चार्ज फीचरमुळे मिळतो. ब्लूटूथ ६.०, आयपीएक्स४ वॉटर रेझिस्टन्स आणि मल्टी-कनेक्ट सपोर्टही आहे.

रोजच्या वापरासाठी बोट एअरडोप्स प्लस २२१ हा पर्याय आहे. त्यांचीही किंमत ९९९ रुपये आहे. प्रीमियम लेदर-फिनिश केस, बोट स्पेशियल ऑडिओ आणि ६० तासांपर्यंतचा प्लेबॅक यात मिळणार आहे. याशिवाय १३ मिमी ड्रायव्हर्स, ब्लूटूथ ६.०, एआय ईएनएक्स तंत्रज्ञानासह दोन मायक्रोफोन्स आणि ५५ मिलीसेकंद लो लेटन्सीसह बीस्ट मोड आहे. एएसएपी चार्ज फीचरमुळे केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १५० मिनिटांपर्यंतचा प्लेबॅक मिळतो.

संगीत ऐकण्यासाठी आणि कॉलिंगसाठी नॉइज बड्स एन१ चांगला पर्याय ठरणार आहे. यात ११ मिमी ड्रायव्हर्स आणि एकूण ४० तासांपर्यंतचा प्लेबॅक मिळणार आहे. त्याची किंमत ८९९ रुपये आहे. कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ईएनसी) सुविधेसह चार मायक्रोफोन्स आणि ब्लूटूथ ५.३ कनेक्टिव्हिटीही दिली आहे.

कमी किमतीत चांगली बॅटरी लाईफ हवी असेल, तर बाउल्ट ऑडिओ झेड४० हा पर्याय आहे. त्याची किंमत ८९९ रुपये आहे. यात ६० तासांपर्यंतच्या प्लेबॅकचा दावा करण्यात आला आहे. या ईअरबड्समध्ये १० मिमी ड्रायव्हर्स, कॉलिंगसाठी झेन ईएनसी मायक्रोफोन तंत्रज्ञान आणि लो लेटन्सी गेमिंग सपोर्ट दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ