मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:52 IST

डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांत बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की

रोजच्या नाश्त्याला कंटाळा आला असेल तर पालक आणि ओट्सपासून बनणारी ही पौष्टिक टिक्की झटपट आणि सोप्या पद्धतीने घरी करता येते.

डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांत बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

रोज सकाळी नाश्त्याला काहीतरी वेगळं आणि तब्येतीला चांगलं खावंसं वाटतं, पण कांदापोहे, उपमा किंवा शिरा खाऊन कंटाळा येतोच. असा कंटाळा आला की नवनवीन पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते. वजन वाढेल या भीतीने बरेच जण सकाळचा नाश्ता टाळतात, पण उपाशी राहिल्याने वजन कमी होण्याऐवजी थकवा आणि अशक्तपणा वाढून तब्येत बिघडू शकते. त्यामुळे सकाळी पोटभर आणि पौष्टिक नाश्ता करणं गरजेचं आहे. यासाठी एक सोपा आणि झटपट होणारा पर्याय म्हणजे पालक ओट्स टिक्की.

ओट्स तसं नेहमीच दूध किंवा दह्यात भिजवून खाल्लं जातं, पण त्याचाही कंटाळा आला की याच ओट्सपासून टिक्की बनवून खाता येते. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळतं. पालकमध्ये भरपूर लोह असतं, तर ओट्समध्ये प्रोटीन, फायबर आणि विविध जीवनसत्त्वांचा खजिना असतो. त्यामुळे नाश्त्याला किंवा दिवसभरात इतर कधीही ओट्सपासून बनवलेली ही प्रोटीनयुक्त टिक्की खाता येते.

ही टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य अगदी घरात सहज मिळणारं आहे. यामध्ये पालक, ओट्स, पनीर, मखाणे, हिरवे वाटाणे, दही, हिरवी मिरची, मीठ, तेल, काळीमिरी पावडर, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, बेसन आणि आलं इतकं साहित्य लागतं.

ही टिक्की बनवण्याची कृती सोपी आहे. सर्वप्रथम गरम पाण्यात पालक, हिरवे वाटाणे आणि आलं घालून उकळवून घ्यायचं. या शिजवलेल्या भाज्या थंड झाल्या की मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करायची. दुसरीकडे एका मोठ्या वाटीत दही घेऊन त्यात बारीक केलेले ओट्स घालून ते मऊ होण्यासाठी बाजूला ठेवायचं. त्यानंतर मखाणे पाण्यात घालून पाच मिनिटं भिजत ठेवायचे आणि मग हाताने पिळून त्यातलं पाणी काढून टाकायचं.

आता तयार केलेली पालकाची पेस्ट एका वाटीत काढून घ्यायची आणि त्यात किसलेलं पनीर, बेसन, भिजवलेले मखाणे, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि जिऱ्याची पेस्ट घालून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. हे मिश्रण तयार झालं की त्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवायच्या आणि तव्यावर गरम तेलात दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजायच्या.

अशा प्रकारे कमीत कमी साहित्यात आणि अगदी थोड्या वेळात कुरकुरीत पालक ओट्स टिक्की तयार होते. सकाळच्या घाईच्या वेळेत झटपट बनणारा आणि पोट भरणारा हा नाश्ता आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरतो. कमी साहित्यात, कमी वेळात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांमधून बनणारी ही टिक्की रोजच्या नाश्त्यातला कंटाळा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ