मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:59 IST

'चिकिझिंग' चित्रपटाचं पोस्टर आलं, १२ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

एका गरीब घरातल्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट सांगणारा 'चिकिझिंग' हा मराठी चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'चिकिझिंग' चित्रपटाचं पोस्टर आलं, १२ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं, एखादा रंगीत दगड खजिना वाटणं, काठी जादूची कांडी वाटणं आणि बंद दरवाजापलीकडचं जग म्हणजे एक मोठं स्वप्न वाटणं, अशाच निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग' या आगामी मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत, १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांसाठी येणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.

दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे यांनी हा सिनेमा प्रस्तुत केला असून ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने याची निर्मिती केली आहे. सुप्रिया बागते या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत, तर शब्बीर साबुवाला, रचना वोरा, ऋषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उन्मेश कुलकर्णी हे सहनिर्माते म्हणून जोडले गेले आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी राजेंद्र बागते आणि वैभव कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. एका हिलस्टेशनच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची कथा घडते. गरिबीत वाढणाऱ्या एका चुणचुणीत, स्वप्नाळू आणि खोडकर मुलाभोवती ही गोष्ट फिरते.

चिक्या नावाचा हा मुलगा दर शनिवारी आईसोबत एका श्रीमंत निवासी शाळेत जातो आणि त्या शाळेच्या भव्य जगाने भारावून जातो. बंद असलेलं मोठं लोखंडी गेट आणि त्याच्या आतलं वेगळंच विश्व त्याला स्वप्नवत वाटतं. त्या स्वप्नाचा गुपचूप पाठलाग करण्याचा त्याचा प्रवास सिनेमात दाखवला आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतातलं एक बुजगावणं हा त्याचा एकमेव मित्र आहे, जो त्याची सगळी गुपितं जपून ठेवतो. त्याच्याशी गप्पा मारणं, तायडीसोबत लाकूडफाटा गोळा करणं, दिवाळीत इतर मुलं फटाके फोडत असताना ते लांबून पाहणं, वेगवेगळ्या वस्तू शाळेच्या दप्तरात जपून ठेवणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याचं जग उलगडत जातं. हे सगळं तो का करतो, ही फक्त निरागसता आहे की त्याच्या मनात आणखी काही सुरू आहे, याची उत्तरं शोधताना मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना विचार करायला लावण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.

'चिकिझिंग' हा फक्त लहान मुलांसाठीचा सिनेमा नाही, तर मुलांसोबत पालकांनीही बघावा असा बालपण, स्वप्नं, कुटुंब आणि आशावाद यांचा हळुवार उत्सव आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांना पुन्हा जवळून बघण्याची संधी हा सिनेमा देतो, कारण प्रत्येक मुलाच्या मनात एक स्वप्न असतं.

या सिनेमात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश आणि डॉ. सोनाली घाटणेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'चिकिझिंग' यंदाच्या दिवाळीत, १२ नोव्हेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुलांच्या स्वप्नांची ही गोष्ट मोठ्यांनाही त्यांचं स्वतःचं बालपण आठवून देणारी ठरेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ