मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:56 IST

मायग्रेनच्या त्रासाने हैराण? या सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

मायग्रेनचा त्रास सुरु झाल्यास कोणती काळजी घ्यावी आणि तो टाळण्यासाठी रोजच्या सवयींमध्ये काय बदल करावेत, याची माहिती.

मायग्रेनच्या त्रासाने हैराण? या सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

सध्याच्या काळात मायग्रेनचा त्रास खूप जणांना जाणवतो. वेगवेगळ्या कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो. मायग्रेन म्हणजे नुसती डोकेदुखी नाही, तर याला सायकोसोमेटिक डिसऑर्डर मानलं जातं. डोक्याच्या पुढच्या भागात, कपाळावर किंवा डोळ्यांच्या आसपास मायग्रेनची वेदना जास्त जाणवते. त्यासोबत मळमळ, उलट्या आणि तीव्र प्रकाश-आवाजामुळे अस्वस्थताही येऊ शकते. मायग्रेनचा झटका काही तास ते काही दिवसांपर्यंत राहू शकतो आणि वेदना इतकी तीव्र असते की रोजची कामं करणंही अवघड होऊन बसतं. त्यामुळे मायग्रेनचा त्रास जाणवल्यास नेमकी कोणती काळजी घ्यावी, हे समजून घेणं गरजेचं आहे.

मायग्रेनचा त्रास सुरू झाला की सगळ्यात आधी तीव्र प्रकाश आणि गोंगाटापासून लांब जावं. शांत आणि मंद प्रकाश असलेल्या खोलीत थोडा वेळ आराम केल्याने फरक पडू शकतो. तीव्र प्रकाश आणि आवाजामुळे अनेकांचा त्रास आणखी वाढतो. डोक्यावर किंवा मानेवर थंड पट्टी ठेवली तरी काही जणांना बरं वाटतं. डोकेदुखी वारंवार होत असेल किंवा खूपच त्रासदायक वाटत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे नेमकं कारण कळून त्यावर योग्य उपचार करता येतील.

मायग्रेन होताना किंवा तो टाळण्यासाठी काही जणांना डोक्याच्या हलक्या मालिशचा फायदा होतो. डोकं आणि मानेच्या स्नायूंवर ताण आल्याने काही जणांची डोकेदुखी वाढू शकते. अशावेळी मालिशमुळे तो ताण कमी होऊन आरामदायी वाटू शकतं. डोक्याच्या हलक्या हाताने केलेल्या मालिशमुळे स्नायूंवरचा ताण निवळतो आणि त्रास कमी होण्यास मदत होते.

पुरेशी झोप न झाल्यानेही मायग्रेनचा त्रास वाढतो. फक्त कमी झोप हेच कारण नाही, तर जास्त झोपल्यानेही किंवा झोपायच्या-उठायच्या वेळा सतत बदलल्यानेही काही जणांना त्रास होतो. त्यामुळे रोज ठराविक वेळेला झोपायचं आणि उठायचं ठरवावं. तसंच रात्री झोपण्याआधी मोबाईल आणि इतर स्क्रीनचा वापर कमी करावा. झोपेची शिस्त पाळल्याने मायग्रेनचा त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

तीव्र प्रकाश हे मायग्रेनच्या डोकेदुखीचं एक सामान्य कारण मानलं जातं, याला फोटोफोबिया म्हणतात. प्रकाशामुळे डोकेदुखी वाढत असेल, तर घरी किंवा कामाच्या ठिकाणी खूप तीव्र प्रकाशाचे बल्ब किंवा दिवे वापरणं टाळावं. खोलीत पूर्ण अंधार करणारे पडदे वापरावेत आणि बाहेर पडताना सनग्लासेस लावावेत. संगणकावर काम करत असाल तर अँटी-ग्लेअर स्क्रीन वापरणंही उपयोगी ठरू शकतं. या साध्या सवयींमुळे मायग्रेनचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होऊ शकते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामध्ये कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ