सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:22 IST

लखनौतील शिवा शर्मा मृत्यूप्रकरणी मॉडेल श्रद्धा दुबेसह तिघांना नागपुरात अटक

लखनौमधील शिवा शर्मा यांच्या मृत्यूप्रकरणी फरार असलेली मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक तन्वीर अली ऊर्फ दानिश यांना नागपुरात अटक झाली आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये झालेल्या शिवा शर्मा यांच्या मृत्यूप्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली मॉडेल श्रद्धा दुबे हिला नागपुरात अटक करण्यात आली आहे. तिच्यासोबत तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांचा चालक तन्वीर अली ऊर्फ दानिश यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. श्रद्धा दुबे ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल आहे. रेस्टॉरंट मालक शिवा शर्मा यांच्या मृत्यूशी संबंधित ही अटक असल्याचे लखनौचे पोलीस आयुक्त तरुण गौबा यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफने आणि नागपूर पोलिसांनी मिळून काल, 20 ऑक्टोबरला या तिघांना नागपुरातील बेलतरोडी भागातील एका इमारतीजवळून ताब्यात घेतले. त्यानंतर तिन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, अशी माहिती आहे.

आज उत्तर प्रदेश पोलीस तिघांचा ट्रांझीट रिमांड घेऊन त्यांना लखनौला घेऊन जाणार आहेत, अशी माहिती आहे. श्रद्धा दुबे आणि रश्मी दुबे या दोन महिला आरोपींना नेण्यासाठी नागपुरात आलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकात महिला कॉन्स्टेबल नव्हती. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या महिला कॉन्स्टेबल आज नागपूरला पोहोचल्यानंतरच तिन्ही आरोपींना उत्तर प्रदेशात नेले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, 9 ऑक्टोबरला लखनौमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून शिवा शर्मा यांचा मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणावर संशय व्यक्त करण्यात आला आणि तपास पोलिसांकडे सोपवण्यात आला. पोलिसांच्या तपासात ही घटना केवळ दुर्घटना नसून हत्या असल्याचे नंतर समोर आले होते. तेव्हापासून शिवा शर्मा यांची मैत्रीण असलेली मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांचा ड्रायव्हर दानिश फरार होते.

दोन दिवसांपूर्वी, म्हणजे 19 ऑक्टोबरला, हे तिघे कानपूरच्या एका हॉटेलमधून भाड्याच्या वाहनाने नागपुरात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी सूचना दिल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातून आलेले ते वाहन नागपुरातील गणेश पेठ परिसरात शोधून काढले. वाहनाच्या चालकाने तिघांना गणेश पेठ परिसरात सोडल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी शहरात त्यांचा शोध घेतला. तिघे इ-रिक्षात बसून गणेश पेठेतून चीचभुवन परिसरात गेल्याचे दिसून आले.

या कारवाईनंतर शिवा शर्मा यांच्या आई रंजना शर्मा यांनी फरार असलेल्या तिन्ही आरोपींच्या अटकेचे स्वागत केले आहे. मॉडेल श्रद्धा दुबेच्या अटकेला त्यांनी "न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल" असे म्हटले. उत्तर प्रदेश पोलीस, विशेष कृती दल (STF) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभारही मानले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ