किया इंडियाकडून सप्टेंबरमध्ये सेल्टॉस, सोनेट, कार्निव्हलसह गाड्यांवर 1.50 लाखांपर्यंत सवलत
किया इंडियाने सप्टेंबर 2026 साठी सोनेट, सिरॉस, सेल्टॉस, कॅरेन्स क्लाव्हिस, कॅरेन्स क्लाव्हिस ईव्ही, कार्निव्हल आणि सोरेंटो या गाड्यांवर विविध सवलती जाहीर केल्या आहेत.
सणासुदीच्या हंगामात नवी गाडी घ्यायचा विचार करणाऱ्यांसाठी किया इंडिया कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीने सप्टेंबर 2026 या महिन्यासाठी आपल्या बहुतांश लोकप्रिय गाड्यांवर खास ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्या असून, ग्राहकांना तब्बल 1.50 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. या ऑफरमध्ये सोनेट, सिरॉस, सेल्टॉस, कॅरेन्स क्लाव्हिस, कॅरेन्स क्लाव्हिस ईव्ही, कार्निव्हल आणि सोरेंटो या सगळ्या गाड्यांचा समावेश आहे.
कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्स अशा वेगवेगळ्या पर्यायांतून ही सूट दिली जात आहे. मात्र ही सवलत शहरानुसार, निवडक व्हेरियंट्सवर आणि MY2026 स्टॉकच्या उपलब्धतेनुसार बदलू शकते, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
किया सोनेट खरेदी करणाऱ्यांना 20,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस, 15,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस आणि 15,000 रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट असं मिळून एकूण 50,000 रुपयांची बचत होणार आहे. सिरॉसच्या पेट्रोल व्हर्जनवर 20,000 रुपये एक्स्चेंज, 20,000 रुपये स्क्रॅपेज आणि 15,000 रुपये कॉर्पोरेट सवलत असून, एक्सटेंडेड वॉरंटी आणि डीलर लेव्हलवरच्या अतिरिक्त फायद्यांमुळे एकूण बचत 55,000 रुपयांच्या पुढे जाते. सिरॉस ईव्हीवर मात्र फक्त 20,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस दिला जात आहे.
कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही सेल्टॉसवर 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 20,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस असं एकूण 40,000 रुपयांचं निश्चित पॅकेज मिळत असून, डीलर स्तरावर आणखी काही सवलती उपलब्ध आहेत.
कॅरेन्स क्लाव्हिस टर्बोवर सगळ्यात मोठी यादी आहे. यात 10,000 रुपये रोख सूट, 30,000 रुपये एक्स्चेंज बोनस, 15,000 रुपये कॉर्पोरेट सवलत, 20,000 रुपये लॉयल्टी बोनस आणि 20,000 रुपये स्क्रॅपेज बोनस मिळून एकूण 95,000 रुपयांचा फायदा होतो. याच गाडीच्या इलेक्ट्रिक व्हर्जन म्हणजे कॅरेन्स क्लाव्हिस ईव्हीवर 20,000 रुपये एक्स्चेंज, 15,000 रुपये कॉर्पोरेट, 20,000 रुपये लॉयल्टी आणि 20,000 रुपये स्क्रॅपेज बोनस मिळून 75,000 रुपयांची बचत होते.
सप्टेंबरच्या यादीत सगळ्यात जास्त सवलत कार्निव्हलवर आहे. या गाडीवर 1 लाख रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि 50,000 रुपयांचा कॉर्पोरेट फायदा मिळून थेट 1.50 लाख रुपयांची सूट मिळते. यासोबत स्क्रॅपेज बोनसचाही उल्लेख आहे, पण त्याची नेमकी रक्कम जाहीर केलेली नाही. दुसरीकडे, प्रीमियम एसयूव्ही सोरेंटोवर 20,000 रुपये लॉयल्टी बोनस आणि 20,000 रुपये एक्स्चेंज बोनस असं एकूण 40,000 रुपयांचे फायदे मिळणार आहेत.
या महिन्यात किया कंपनीची नवी गाडी घेण्याचा विचार असेल, तर शोरूममध्ये जाऊन मॉडेलची उपलब्धता, ठराविक व्हेरियंट आणि लागू होणारे सगळे फायदे तपासून अंतिम ऑन-रोड कोटेशन घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून नेमकी किती रक्कम द्यावी लागेल याची स्पष्ट कल्पना येईल.