मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:33 IST

काँग्रेसमध्ये दुसऱ्या दिवशीही नेत्यांचे प्रवेश; टिळक भवनात सपकाळ आणि सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडून स्वागत

मुंबईतील टिळक भवनात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी (श.प.) नेते आणि भाजप शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यासह अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये दुसऱ्या दिवशीही नेत्यांचे प्रवेश; टिळक भवनात सपकाळ आणि सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडून स्वागत
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मुंबई : काँग्रेसमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या पक्षांतील नेते आणि पदाधिकारी दाखल झाले. पक्षाचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी मंत्री वामनराव नाईक यांची नात गितांजली नाईक यांनीही पक्षात प्रवेश केला. भाजप शिक्षक आघाडी आणि उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ कल्याणचे अध्यक्ष विकास मुकुंदराव पाटील यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रभारी डॉ. सिरिवेल्ला आणि प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी या सगळ्यांचे स्वागत केले.

या वेळी CWC चे सदस्य आणि राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, AICC चे सचिव बी.एम. संदीप, रेहाना चिस्ती, ज्येष्ठ नेते अशोक पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस ऍड. संदेश कोंडविलकर, प्रवेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, धीरज देशमुख, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनावणे, प्रवीणकुमार शेप आणि इतर जण उपस्थित होते.

प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद म्हणाले की, बीड जिल्ह्यासह ज्या जिल्ह्यांत काँग्रेस संघटनेची ताकद कमी आहे, तिथे संघटन मजबूत करण्याची गरज आहे. पडीक जमीन कसण्याचा प्रयत्न शेतकरी कधीच सोडत नाही, ती जमीन सुपीक होईपर्यंत तो मशागत करत राहतो. तसंच ज्या ठिकाणी पक्षाची ताकद कमी आहे, तिथे जोमाने काम करा आणि संघटनेची ताकद वाढवा, असं ते म्हणाले.

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, तसेच सर्वसामान्य जनतेचे मुलभूत हक्क आणि अधिकार कायम राहावेत यासाठी केंद्रात काँग्रेसचं सरकार आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे हात बळकट करायचे आहेत, असं प्रसाद यांनी सांगितलं. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे ८८२ दिवस आहेत, त्यामुळे जोमाने काम करा, असं आवाहन त्यांनी केलं.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या वेळी म्हणाले की, आपल्या आजोबा-पणजोबांनी आरएसएस-भाजपाचा कुटील डाव ओळखला होता, म्हणूनच त्यांनी ७० वर्षे त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. आरएसएस-भाजपाचा अजेंडा समाजात फूट पाडण्याचा आणि भेदाभेद करण्याचा आहे, हा डाव आता तरुणाईनेही ओळखला आहे.

काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे आणि काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो, त्यामुळे गावागावात काँग्रेसचा विचार पोहोचवा, असं सपकाळ म्हणाले. आजच्या पक्ष प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात आणि खान्देशात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढण्यास मदत होईल, असंही त्यांनी सांगितलं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ