गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:15 IST

जिओचे नवे एआय स्मार्ट चष्मे: नजर टाकताच करता येणार यूपीआय पेमेंट

आयएमसी 2026 मध्ये रिलायन्स जिओने नवे एआय वेअरेबल्स सादर केले आहेत. किंमत अजून जाहीर झालेली नाही आणि वर्षअखेरीस हे चष्मे बाजारात येऊ शकतात.

जिओचे नवे एआय स्मार्ट चष्मे: नजर टाकताच करता येणार यूपीआय पेमेंट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रिलायन्स जिओने आयएमसी (IMC) 2026 मध्ये आपली नवी पिढीतली एआय वेअरेबल्स लोकांसमोर ठेवली आहेत. या प्रदर्शनात कंपनीने स्मार्ट एआय बड्स तर आणले आहेतच, पण त्यासोबत स्मार्ट ग्लासेसची, म्हणजे स्मार्ट चष्म्यांची एक अगदी नवी कॅटेगरीही सादर केली आहे. टेक्नोलॉजीच्या जगात या घोषणेची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

हे चष्मे फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करणे, गाणी ऐकणे किंवा कॉल घेणे इतक्या साध्या कामांसाठी बनवलेले नाहीत. भविष्यात उपयोगी पडतील अशी अनेक अत्याधुनिक फीचर्स त्यांच्यात देण्यात आली आहेत.

सगळ्यात मोठा आकर्षणाचा मुद्दा म्हणजे यूपीआय पेमेंट. फोनला हात न लावता, फक्त नजर टाकून पैसे भरता येतील, असे या चष्म्यांमुळे शक्य होणार आहे. त्यासाठी हे चष्मे 'विजुअल इंटेलिजेंस' (Visual Intelligence) वापरतात. ही यूपीआय पेमेंट प्रणाली जिओ आणि एनपीसीआय (NPCI) यांनी मिळून अंतिम केली आहे.

वापरणारा माणूस समोर काय पाहतोय, ते चष्मा समजून घेतो. त्यानुसार तो रिअल-टाईम माहिती देतो आणि क्यूआर कोड स्कॅन करून थेट पेमेंटही पूर्ण करू शकतो.

जिओने या चष्म्यांचे दोन मुख्य मॉडेल समोर आणले आहेत. पहिला आहे ऑडियो बेस्ड मॉडेल. यात स्टेनलेस-स्टीलची फ्रेम आहे आणि तो पूर्णपणे ऑडिओवर चालतो. दिसायला तो अगदी साध्या चष्म्यासारखाच वाटतो.

दुसरे मॉडेल म्हणजे विज्युअल इंटेलिजेंस मॉडेल. यात स्पीकर्स आणि इन-बिल्ट कॅमेरा आहे. वापरणाऱ्याच्या नजरेसमोरच्या गोष्टी ओळखून हे मॉडेल रिअल-टाईम एआय असिस्टन्स देते.

या दोन्ही चष्म्यांमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन म्हणजे थेट भाषांतराची सोय आहे. अनेक भारतीय भाषांना सपोर्ट आणि प्रगत एआय व्हॉईस असिस्टंटही त्यात आहे. मात्र सुरक्षेच्या बाबतीत ऑथेंटिकेशन आणि ट्रान्झॅक्शन लिमिट्स याबद्दलची तांत्रिक माहिती जिओने अजून उघड केलेली नाही. तरीही भारतीय बाजारपेठेसाठी हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.

आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे किंमत किती? सध्या जिओने या चष्म्यांची अधिकृत किंमत, बॅटरी लाईफ किंवा पूर्ण स्पेसिफिकेशन्स जाहीर केलेली नाहीत. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे स्मार्ट चष्मे यंदाच्या वर्षअखेरीस, म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 पर्यंत भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च होऊ शकतात. नेमकी किंमत किती आहे, ते लॉन्चिंगच्या वेळीच कळणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ