बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:48 IST

जिओ आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धूम, जीएमपी थेट १७० रुपयांवर; लाँच कधी?

जिओ आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धूम, जीएमपी थेट १७० रुपयांवर; लाँच कधी? छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल शाखा असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या मेगा आयपीओबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय. आयपीओ बाजारात यायच्या आधीच त्याची चर्चा सुरू झाली आहे. कंपनीने अजून प्राईस बँड जाहीर केलेला नाही आणि अधिकृत लॉन्चची तारीखही निश्चित झालेली नाही. तरीही ग्रे मार्केटमध्ये या आयपीओला मोठी मागणी आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिओ प्लॅटफॉर्म्सचा जीएमपी १७० रुपयांपर्यंत वाढला. यावरून गुंतवणूकदारांकडून या शेअर्सना किती प्रचंड मागणी आहे, हे स्पष्ट दिसतं.

या शेअरचा प्रवास पाहिला तर सुरुवातीला त्याने अनलिस्टेड मार्केटमध्ये १२० ते १२५ रुपयांच्या प्रीमियमवर एन्ट्री केली. काही दिवसांनंतर तो १४० ते १४५ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होता. त्यानंतर एक-दोन दिवसांपूर्वी तो सुमारे १६० ते १६७ रुपयांपर्यंत वाढला आणि आता १७० रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. इतकी या आयपीओची क्रेझ आहे.

बाजारात या आयपीओची बरीच चर्चा आहे. कंपनी सुमारे २७० दशलक्ष नवे शेअर्स जारी करून या आयपीओतून ३२,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे, असं सांगितलं जातंय. शेअर्ससाठी प्राईस बँड १,३०० ते १,४५० रुपयांदरम्यान असू शकतो, असंही म्हटलं जातंय. मात्र याला अजून अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.

जागतिक गुंतवणूक बँकर्सच्या अंदाजानुसार कंपनीचं मूल्यांकन सुमारे १७० अब्ज रुपये, म्हणजेच ११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जिओ या मूल्यांकनावर सूचीबद्ध झाली, तर ती देशातील २ ते ३ सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक ठरेल.

आयपीओ कधी उघडणार, याबद्दलही माहिती समोर आली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचा मेगा आयपीओ याच महिन्यात, म्हणजे ऑक्टोबर २०२६ मध्ये लॉन्च होणार असल्याचं सांगितलं जातंय. तो १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला होईल, तर किरकोळ गुंतवणूकदारांना २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान बोली लावण्याची संधी मिळेल, असं म्हटलं जातंय.

कंपनी १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात सेबीकडे आपला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच आरएचपी सादर करेल, अशी अपेक्षा आहे. आयपीओनंतर कंपनीच्या शेअर्सचं सूचीकरण २८ ऑक्टोबर २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ