शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
15 ऑक्ट | 15:10  विदर्भात दुष्काळाची पकड घट्ट, आणखी १३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश 11:40  भांडेवाडी हत्याकांडातील तीन महिन्यांपासून फरार कथित सूत्रधार अमन कैतवार उत्तर प्रदेशातून अटकेत 11:11  राज्यात २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी; प्राथमिक शाळा १८, माध्यमिक १९ नोव्हेंबरला उघडणार 10:40  गेवराईत चौथीच्या विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा आरोप; शिक्षक पोलिसांच्या ताब्यात 09:41  नागपूर पदवीधर निवडणूक: २३ ऑक्टोबरला मतदान, जिल्हा प्रशासनाची तयारी वेगात; अधिकाऱ्यांना सूचना 08:54  सोने-चांदीचे १६ ऑक्टोबरचे दर जाहीर: २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम १४,७४३ रुपये, चांदी प्रति ग्रॅम २२९.९० रुपये
सर्व थेट अपडेट
14:16 IST

कोलोनमध्ये रिमोटवर चालणाऱ्या रोबोचा तरुणीला त्रास; दोन तरुणांवर संशय, रोबो पोलिसांच्या ताब्यात

जर्मनीतील कोलोन शहरात फास्ट फूड दुकानाबाहेर एका तरुणीला रोबोने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. रोबो रिमोटने चालवला जात होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

जर्मनीतील कोलोन शहरात ११ ऑक्टोबरच्या रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. एका फास्ट फूड दुकानाबाहेर उभ्या असलेल्या तरुणीला एका रोबोने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. पोलिसांनी हा रोबो ताब्यात घेतला असून दोन तरुणांवर संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही वर्षांत रोबोचा वापर खूप वाढला आहे. कंपनीत, हॉटेलमध्ये, हॉस्पिटलमध्ये सगळीकडे रोबो काम करताना दिसतात. धोक्याची कामेही रोबो सहज करतात. पण त्याच रोबोचा वापर वाईट कामासाठी होऊ लागला आहे, असा प्रकार आता जर्मनीत समोर आला आहे.

ही घटना रात्री सुमारे ११.४५ वाजता घडली. कोलोनमधील एका फास्ट फूड दुकानाबाहेर ती तरुणी तिच्या दोन मैत्रिणींसोबत उभी होती. तिच्या मैत्रिणी १७ आणि १८ वर्षांच्या आहेत. त्याच वेळी अचानक तिथे एक रोबो आला.

हा रोबो साधारण १२० सेंटीमीटर उंच होता आणि त्याचा रंग लाल आणि सोनेरी होता. तो हळूहळू तरुणीच्या मागून आला आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला. तिला काही कळायच्या आतच हे सगळे घडले. तिथे असलेल्या लोकांनाही नेमके काय चालले आहे ते समजले नाही. तरुणीने लगेच आरडाओरड केली आणि पोलिसांना फोन केला.

पोलिसांच्या तपासात समोर आले की हा रोबो आपोआप काम करत नव्हता, तर कोणीतरी त्याला रिमोटने चालवत होते. पोलिसांना दोन तरुणांवर संशय आहे. त्यातला एक १६ वर्षांचा मुलगा रोबोचा मालक आहे आणि दुसरा त्याचा १९ वर्षांचा मित्र आहे. रिमोटने रोबो चालवून या दोघांनीच हा प्रकार केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

एवढेच नाही, तर या दोघांनी घटनेचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर लाईव्ह दाखवला. त्यातला एक जण व्हिडिओवर बोलतही होता, असे समोर आले आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ते दोघे तिथेच सापडले. त्यांनी रोबो एका फोक्सवॅगन गाडीच्या डिक्कीत लपवून ठेवला होता. पोलिसांनी तो लगेच ताब्यात घेतला आणि दोघांचे मोबाईल फोनही जप्त केले.

आता रोबो नक्की कसा चालवला जात होता, त्याच्या हालचाली रिमोटने कंट्रोल केल्या होत्या का, व्हिडिओ का काढला आणि तो लाईव्ह का केला, याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही तरुणांची चौकशी सुरू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पुढील कारवाई सुरू आहे.

टेक्नॉलॉजी वाढते तसा तिचा चांगला वापर होतोच, पण वाईट वापरही वाढतोय. रोबोचा वापर गुन्ह्यांसाठी होऊ शकतो हे या घटनेने दाखवून दिले आहे. जर्मनीतील ही घटना पहिलीच आहे असे नाही, याआधीही काही ठिकाणी अशा तक्रारी आल्या होत्या. रोबो बनवताना त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी कशी घ्यायची, हा प्रश्न यामुळे उभा राहिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ