मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:59 IST

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ, आवाज ऐकताच आयफोन देणार अलर्ट, असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

आयओएस 26 आणि त्यानंतरच्या अपडेट्समध्ये अ‍ॅपलने नेम रिकॉग्निशन नावाचं नवं एक्सेसिबिलिटी फीचर आणलं आहे. हे फीचर कसं काम करतं, ते जाणून घ्या.

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ, आवाज ऐकताच आयफोन देणार अलर्ट, असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

हेडफोन लावून गाणी ऐकत असताना किंवा एखाद्या कामात पूर्णपणे गुंतलेलं असताना कोणी मागून हाक मारली, तरी ते कळतच नाही, असा अनुभव अनेकांना येतो. आपल्या कानात हेडफोन असल्यामुळे किंवा एखाद्या कामात लक्ष गुंतल्यामुळे बाजूचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. नेमकं याच अडचणीवर उपाय म्हणून अ‍ॅपलने एक नवं फीचर आणलं आहे. आयओएस 26 आणि त्यानंतरच्या अपडेट्समध्ये हे फीचर मिळणार आहे.

या नव्या एक्सेसिबिलिटी फीचरचं नाव आहे नेम रिकॉग्निशन. या फीचरमुळे आयफोन सतत आजूबाजूचे आवाज ऐकत राहतो आणि कोणी तुमचं नाव घेतलं की लगेच फोन एक नोटिफिकेशन पाठवून तुम्हाला अलर्ट देतो. यासाठी सतत फोनची स्क्रीन बघत बसायची गरज नाही, हे या फीचरचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच फोन खिशात किंवा बॅगेत असला, तरीही तो तुमचं नाव ऐकून तुम्हाला सावध करू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, फोन फक्त नावच नाही तर डोरबेल, सायरन, अलार्म यासारखे काही खास आवाजही ओळखू शकतो. काही विशेष प्रसंगांमध्ये व्यक्तीचं नाव ओळखण्याचाही यात पर्याय आहे. गोंधळाच्या ठिकाणी किंवा कानात हेडफोन असताना हे फीचर विशेष उपयोगी पडतं. समजा आजूबाजूला खूप गडबड-गोंधळ चालू आहे आणि अशातच कोणी हाक मारली, तर आयफोन तो आवाज ओळखून लगेच सूचना देतो.

हे फीचर आयफोनमध्ये ऑन करण्याची पद्धतही सोपी आहे. सर्वात आधी फोनमधलं सेटिंग ओपन करायचं आणि तिथून एक्सेसिबिलिटी सेक्शनमध्ये जायचं. इथे ऑडिओ अँड व्हिज्युअल किंवा साऊंड रिक्गनायझेशन असा पर्याय दिसतो. फोनमधल्या आयओएस व्हर्जननुसार हा पर्याय वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो, त्यामुळे तो शोधताना थोडा फरक जाणवू शकतो. यानंतर साऊंड रिक्गनायझेशन ऑन करून, उपलब्ध साउंड कॅटेगरीमधून आपल्या गरजेनुसार पर्याय निवडायचा. काही आयफोनवर विशिष्ट आवाज किंवा व्यक्तींशी संबंधित नवीन ओळखण्याचे पर्यायही उपलब्ध असतात, तेही याच सेटिंगमधून सेट करता येतात.

जे लोक सतत हेडफोन वापरतात, त्यांच्यासाठी हे फीचर सर्वात जास्त फायद्याचं ठरणार आहे. गाणी ऐकताना आजूबाजूचे आवाज नीट ऐकू येत नाहीत, अशा वेळी हे फीचर मदतीला येतं. मात्र हे फीचर 100 टक्के अचूक असेलच असं नाही, हे लक्षात ठेवायला हवं. खूप मोठा आवाज असेल, एकाच वेळी अनेक जण बोलत असतील किंवा आवाज खूप लांबून येत असेल, तर तो ओळखण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक वेळी हे फीचर बरोबर काम करेलच असं नाही.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ