iPhone 18 Pro ची किंमत ऐकून नेटकरी हैराण, मीम्सचा पूर आला
iPhone 18 Pro आणि Pro Max लाँच झाल्यावर किमतीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्सचा पाऊस पाडला आहे.
दरवर्षी नवीन आयफोन आला की Apple Store बाहेर लोकांची गर्दी आणि रांगा लागलेल्या दिसतात. यावेळीही तसंच झालं आहे. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच होताच लोक त्याच्यामागे वेडे झाले आहेत. पण यावेळी चर्चेचा विषय फोनचे फीचर्स नसून त्याची किंमत आहे. किंमत ऐकूनच सामान्य माणसाच्या पायाखालची जमीन सरकतेय.
iPhone 18 Pro ची किंमत 1 लाख 64 हजार रुपयांपासून सुरू होते, तर Pro Max ची किंमत थेट 4 लाख रुपयांपर्यंत जाते. म्हणजे एका छोट्या गाडीच्या किमतीएवढे पैसे. त्यामुळे सामान्य माणसाला कर्ज घेतल्याशिवाय हा फोन घेणं शक्य नाही. याच गोष्टीवरून सोशल मीडियावर एकापेक्षा एक भारी मीम्स व्हायरल होत आहेत.
पहिला मीम अशा लोकांसाठी आहे ज्यांनी नवीन आयफोन घ्यायचा विचार केला होता. आधी किंमत 1 लाख असेल असं वाटलं होतं, पण दीड लाखाहून जास्त किंमत पाहून अनेकांनी आपला प्लॅनच रद्द केला. फोन घेण्याआधी आधी बँक बॅलन्स चेक करावा लागतोय, असं या मीममध्ये दाखवलं आहे.
दुसरा मीम घरातून बाहेर काढण्याबद्दल आहे. आई-बाबा अजून घरात राहू देत आहेत हेच नशीब समजा, असं यात लिहिलं आहे. दीड लाखाचा फोन मागितला तर घरचे घराबाहेर काढतील तरी नवल नाही, अशी गंमत विशेषतः कॉलेजच्या मुलांबाबत केली जात आहे.
तिसरा आणि सगळ्यात जुना जोक म्हणजे किडनी विकण्याचा. प्रत्येक वेळी नवीन आयफोन आला की हाच मीम फिरतो. iPhone 18 Pro घ्यायचा असेल तर किडनी विकावी लागेल, असं यात म्हटलं आहे. एका मीममध्ये पूर्ण कुटुंब Apple Store मध्ये जाऊन किडनी कोण देणार असं विचारताना दाखवलं आहे.
चौथा मीम अशा व्यक्तीबद्दल आहे ज्याच्याकडे साधा मोबाईल रिचार्ज करायलाही पैसे नाहीत. iPhone 18 ची किंमत पाहिल्यावर तो फक्त किंमत बघतो आणि डोक्याला हात लावतो, अशी प्रतिक्रिया यात दाखवली आहे.
पाचवा मीम अशा लोकांसाठी आहे ज्यांना काहीही झालं तरी आयफोनच घ्यायचा असतो, कर्ज काढावं लागलं तरी चालेल. सहावा मीम जुन्या iPhone 17 युजर्सबद्दल आहे. काल जे लोक iPhone 17 घेऊन मिरवत होते, त्यांचा फोन आता एका रात्रीत जुना झाला आहे आणि त्यांनाही नवीन फोन घ्यावासा वाटतोय, अशी गंमत केली जात आहे.
सातवा मीम बायकोसाठी नवरा किडनी विकून iPhone 18 Pro घेत असल्याचं दाखवतो, आणि बायको खुश तर सगळं काही खुश असा संदेश देतो. एकूणच iPhone 18 Pro लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर याने धुमाकूळ घातला आहे. ज्यांना परवडतंय ते फोन घेत आहेत, पण ज्यांना परवडत नाही ते निदान या मीम्सवर हसून मन रमवत आहेत.