मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:51 IST

किशोर कुमार यांनी नकार दिला म्हणून एक वर्ष सरकारी रेडिओ, दूरदर्शनवर गाणी बंद

आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर सरकारी माध्यमांनी एक वर्ष बंदी घातली होती, हा किस्सा त्यांच्या मुलाने अमित कुमार यांनी सांगितला.

किशोर कुमार यांनी नकार दिला म्हणून एक वर्ष सरकारी रेडिओ, दूरदर्शनवर गाणी बंद
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

हिंदी सिनेसृष्टीतला एक सुरेल आवाज असलेला गायक किशोर कुमार यांच्यावर एक काळ असा आला होता, जेव्हा त्यांची गाणीच सरकारी माध्यमांवरून पूर्णपणे गायब झाली होती. १९७५ मध्ये आणीबाणी लागू असताना किशोर कुमार यांच्या गाण्यांवर सरकारी रेडिओ आणि दूरदर्शनवर तब्बल एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. ही गोष्ट खुद्द किशोर कुमार यांच्या मुलाने, गायक अमित कुमार यांनी उघड केली होती.

काँग्रेस सरकारच्या त्या वेळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि सरकारच्या २० कलमी कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी गाणे गाण्याची मागणी किशोर कुमार यांना करण्यात आली होती. पण किशोर कुमार यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्या काळात माहिती आणि प्रसारण मंत्री असलेले व्ही. सी. शुक्ला यांना हा नकार अजिबात आवडला नाही. याचा राग म्हणून किशोर कुमार यांच्या सगळ्या गाण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. जितकी सरकारी माध्यमे होती, त्या सगळ्यांवर ही बंदी लागू करण्यात आली होती.

किशोर कुमार हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे गायक आहेत. त्यांनी १९४८ पासून जिद्दी या सिनेमापासून गाण्याला सुरुवात केली होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी त्यांना पहिली संधी दिली होती. त्यानंतर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला अनेक गाणी दिली. त्यांच्या आवाजातलं वैविध्य, गाण्यातला जिवंतपणा आणि योडेलिंगची त्यांची खास शैली यामुळे त्यांनी अनेक दशके हिंदी सिनेसृष्टी आणि संगीत क्षेत्रावर आपला ठसा उमटवला.

राजेश खन्ना यांच्यासाठी आणि अँग्री यंगमॅन म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासाठी किशोर कुमार यांनी अनेक रोमँटिक गाणी गायली. यामध्ये आराधना सिनेमातील रूप तेरा मस्ताना, ब्लॅक मेल सिनेमातील पल पल दिल के पास, मेरे जीवन साथी सिनेमातील ओ मेरे दिल के चैन ही गाणी आहेत. एवढेच नाही, त्यांनी मराठी सिनेसृष्टीसाठीही गाणी गायली आहेत, त्यात गंमत जंमत सिनेमातील अश्विनी ये ना या गाण्याचा समावेश आहे.

कपिल शर्मा शो या कार्यक्रमात अमित कुमार यांनी हा संपूर्ण किस्सा सांगितला होता. सरकारी अधिकारी जेव्हा किशोर कुमार यांच्याकडे गाणे गाण्याचा प्रस्ताव घेऊन गेले होते, तेव्हा किशोर कुमार यांनी थेट प्रश्न विचारला होता की पैसे किती मिळणार आहेत. पैसे मिळणार नसतील तर आपण गाणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले होते. याच कारणामुळे सरकारने त्यांच्यावर बंदी घातली होती आणि ही बंदी जवळपास एक वर्ष टिकली होती.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ