मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:59 IST

होर्मूझमध्ये पुन्हा तणाव, इराणने १९ जहाजे उडवल्याचा दावा, पुष्टी अजून नाही

इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचं कारण देत इस्रायल आणि अमेरिकेनं सुरु केलेलं युद्ध तीन दिवसांऐवजी २१२ दिवस चाललं. आता होर्मूझ सामुद्रधुनीत इराणने १९ जहाजे उडवल्याचा दावा होतोय, पण अजून ठोस पुष्टी नाही.

होर्मूझमध्ये पुन्हा तणाव, इराणने १९ जहाजे उडवल्याचा दावा, पुष्टी अजून नाही
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

इराण अणुबॉम्ब तयार करतोय असं सांगत इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला करून युद्ध सुरु केलं होतं. इस्रायलनं ट्रम्प यांना पटवून दिलं होतं की तीन दिवसांत इराणचा बंदोबस्त करून तिथलं धार्मिक सरकार पाडून आपल्याला हवं तसं सरकार बसवता येईल. राजकीय जाणकारांच्या मते खुद्द नेतन्याहू यांनीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना या युद्धाबाबत प्रेझेन्टेशन दिलं होतं.

पण झालं उलटंच. तीन दिवसांत संपेल असं सांगितलेलं हे युद्ध तब्बल २१२ दिवस चाललं आहे. या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेपेक्षा इराणचीच जीवितहानी जास्त झाली. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या झाली. एका लहान मुलींच्या शाळेवर झालेल्या मिसाईल हल्ल्यात तब्बल १६८ मुली मारल्या गेल्या. इराणमधले महत्त्वाचे राजकीय नेते, संशोधक आणि शास्त्रज्ञही यात मारले गेले.

या युद्धादरम्यान इराणने होर्मूझ सामुद्रधुनी बंद केली आणि पाण्याखाली सुरुंग पेरून तिच्यावर पूर्ण ताबा मिळवला. यामुळे जगातली जवळपास २० टक्के सागरी वाहतूक ठप्प झाली. याचसोबत हुतींनी लाल समुद्रातल्या मार्गावर हल्ले करून आखाती देशांचा तो मार्गही बंद केला. अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी इराणने वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या, तर अमेरिकेनं होर्मूझसमोर ब्लॉकेड लावलं.

त्यानंतर अमेरिकेनं गुपचूप पाण्याखालचे इराणचे सुरुंग शोधायला सुरुवात केली. या प्रक्रियेत इराणने अमेरिकेचे दोन ड्रोनही पकडले. या सगळ्या घडामोडीतून होर्मूझवर इराणचाच कंट्रोल असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर इराणने एक सूचना जारी केली की सर्व्हिस टॅक्स भरल्यास जहाजांना बाहेर पडता येईल. पण अमेरिका यावर अडून बसली आणि अशा जहाजांवर कारवाई करायला सुरुवात केली. त्यामुळे जहाजांची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली. अमेरिका जगाचं न दिलेलं पालकत्व घेऊन सगळ्या जगाला वेठीस धरतेय, अशी भावना इराणमधली जनता व्यक्त करत असल्याचं समजतंय.

इराणने नुकताच अमेरिकेला पुन्हा सात दिवसांचा शांतता प्रस्ताव पाठवला होता, पण ट्रम्प यांनी इराणवर विश्वास नसल्याचं सांगत तो फेटाळला. आधी इराणने होर्मूझ खुली करावी, मगच आम्ही इराणच्या मागण्यांचा विचार करू, असं ट्रम्प यांनी सांगितलं. यावर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेवर विश्वास नसल्याचं सांगत आता अमेरिकेनेच ठरवावं की आमच्या मागण्या मान्य करून शांतता प्रस्थापित करायची की पुन्हा जोरदार युद्ध करायचं, आम्ही दोन्हीसाठी तयार आहोत असं स्पष्ट केलं. म्हणजे चेंडू इराणकडून पुन्हा ट्रम्प यांच्याच कोर्टात टाकला गेला आहे. जागतिक राजकीय विश्लेषकांच्या मते इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेसमोर झुकणार नाही. आता युद्धाला कोणतं वळण द्यायचं हे ट्रम्प यांनाच ठरवावं लागणार आहे.

इराणने सांगितल्याप्रमाणे होर्मूझमध्ये १९ जहाजे उडवण्यात आली आहेत, पण याला अजून ठोस पुष्टी मिळालेली नाही. फक्त काही बातम्यांमध्ये जहाजांना आगी लागल्याचं दिसून आलं आहे, तसंच इशारा दिल्यानंतर जहाजांवर गोळीबार झाल्याचंही म्हटलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही वेळात या हल्ल्याबाबत स्पष्टता येऊ शकेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ