मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:47 IST

Iran-US : युद्ध काही थांबत नाही ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी इराणने मांडलेला प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला आहे.

Iran-US : युद्ध काही थांबत नाही ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाला आता बरेच महिने उलटले आहेत, तरी दोन्ही बाजू माघार घ्यायला तयार नाहीत. प्रत्यक्षात मात्र मागे हटायला कोणीही तयार नाही, अशी स्थिती आहे. या संघर्षात दोघांचेही माल आणि प्राणांचे मोठे नुकसान झाले आहे. इतके नुकसान झाले असूनही कमीपणा स्वीकारून शस्त्र खाली ठेवायला दोघांचाही नकार आहे. उलट एकमेकांना डील देऊन एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरु आहे.

इराण आपल्या अटींवर ठाम आहे, तर अमेरिकाही यावर तोडगा काढण्यासाठी इराणच्या नव्या प्रस्तावाकडे लक्ष ठेवून होती. मात्र अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी इराणने मांडलेला प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकारला आहे.

इराणचा हा प्रस्ताव 'अस्वीकार्य' असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थांमार्फत चर्चा सुरु असतानाच ट्रम्प यांची ही भूमिका पुढे आली आहे.

इराणने अमेरिकेसमोर युद्धविराम आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात अमेरिकेने आपला लष्करी दबाव कमी करावा आणि इराणवरील आर्थिक नाकेबंदी शिथिल करावी, अशी मागणी इराणने केली होती. या अटींवर सहमती झाल्यास सात दिवसांच्या आत होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरु करण्याची तयारी इराणने दाखवली होती.

पर्शियन आखात आणि अरबी समुद्राला जोडणारी होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या मार्गातून मोठ्या प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होत असते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यास ऊर्जा बाजारावर आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका होर्मुझमधून मुक्त आणि सुरक्षित जहाजवाहतुकीवर भर देत आहे, तर त्याबदल्यात अमेरिकेने आपला दबाव कमी करावा अशी मागणी इराणकडून केली जात आहे.

इराणचा प्रस्ताव समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी तो स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाले आहेत. इराणकडून राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याची तयारी दाखवली जात असली, तरी अमेरिकेने आपला दबाव कमी करण्याआधी स्वतःच्या प्रमुख मागण्या मान्य व्हाव्यात, अशी भूमिका घेतली आहे. परिणामी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे खुली करण्याचा प्रश्न अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी कायम आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ