Realme 16 Pro हॅरी पॉटर एडिशन भारतात Flipkart वर दाखल
Warner Bros. Discovery आणि हॅरी पॉटर फ्रँचायझीसोबत भागीदारी करत realme ने हॉगवर्ट्स थीमवर आधारित खास स्मार्टफोन आणला आहे.
हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी realme कंपनीने खास गिफ्ट आणलं आहे. Warner Bros. Discovery आणि हॅरी पॉटर फ्रँचायझीसोबत हातमिळवणी करून कंपनीने realme 16 Pro 5G Harry Potter Edition हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हॉगवर्ट्स थीमवर बेतलेलं खास डिझाइन, कस्टम UI आणि कलेक्टिबल अॅक्सेसरीजचा यात समावेश आहे.
फोनच्या डिझाइनमध्ये हॅरी पॉटरच्या विश्वाची झलक स्पष्ट दिसते. मागच्या बाजूला ब्राऊन लेदर टेक्स्चर आणि Argyle पॅटर्न दिलाय, जो हॅरी पॉटरमधल्या प्रसिद्ध Wizard's Chess थीमवरून घेतलाय. फोनच्या मागच्या भागाच्या मध्यभागी Hogwarts Crest दिलाय, तर कॅमेरा मॉड्यूलची रचना हॅरी पॉटरच्या पाळलेल्या घुबडाच्या - Hedwig - डोळ्यांसारखी केलीय. मेटल मिड-फ्रेमवर 'Welcome to Hogwarts' असा मेसेज लेझरने कोरलेला दिसतो. या फोनसोबत मिळणारं कलेक्टिबल पॅकेज हे या एडिशनचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. हॉगवर्ट्स ट्रंकसारख्या खास बॉक्समध्ये हॅरी पॉटर थीमच्या अनेक वस्तू दिल्या जातात - Hogwarts Acceptance Letter, Hogwarts Express Ticket, Hogwarts Crest Bookmarks, कॅरेक्टर पोस्टकार्ड्स आणि हॉगवर्ट्सचा लोगो असलेलं फोन केस, तसंच खास SIM Ejector Pin. कंपनीने सांगितलंय की हा खास गिफ्ट बॉक्स फक्त 5,000 युनिट्समध्येच उपलब्ध आहे.
डिस्प्लेबाबत बोलायचं झालं तर फोनमध्ये 6.78 इंचाचा 144Hz AMOLED डिस्प्ले दिलाय, ज्यामुळे स्क्रोलिंग, गेमिंग आणि व्हिडिओ बघण्याचा अनुभव स्मूथ होईल असं म्हटलंय. डिस्प्लेला जास्त ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्टही आहे. परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Dimensity 7300 Max 5G चिपसेट बसवलाय, जो रोजच्या वापरासोबत मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठीही चांगली प्रोसेसिंग क्षमता देतो.
बॅटरीच्या बाबतीत फोनमध्ये 7,000mAh ची Titan Battery आहे, आणि त्यासोबत 80W Ultra Charge फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळतो. realme नुसार यात Bypass Charging आणि बॅटरी हेल्थशी संबंधित फीचर्सही दिले आहेत. कॅमेराबद्दल सांगायचं तर मागच्या बाजूला 200MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा दिलाय.
हा फोन फक्त बाहेरून हॅरी पॉटर थीममध्ये नाही, तर सॉफ्टवेअरमध्येही खास कस्टमायझेशन देतो. हॉगवर्ट्स विश्वाशी संबंधित कस्टम UI एलिमेंट्स आणि थीम्स या एडिशनमध्ये मिळतात, त्यामुळे फोन वापरण्याचा एकूण अनुभवही हॅरी पॉटर थीमशी जोडला जातो. realme 16 Pro 5G Harry Potter Edition ची विक्री भारतात realme आणि Flipkartच्या माध्यमातून सुरू करण्यात आलीय. त्यामुळे हॅरी पॉटर फ्रँचायझीचे चाहते आणि कलेक्टर्ससाठी हा फोन फक्त एक डिव्हाइस न राहता एक खास कलेक्टिबल एडिशन ठरणार आहे.