गुरु-चंद्राच्या संयोगाने चार राशींना धनलाभाची संधी, जाणून घ्या कोणत्या
१८ सप्टेंबरच्या रात्री चंद्र धनु राशीत तर गुरु कर्क राशीत गेल्याने राशीपरिवर्तन योग तयार झालाय. ज्योतिषशास्त्रानुसार याचा फायदा कर्क, कन्या, धनु आणि मीन राशीच्या लोकांना होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रात गुरू आणि चंद्र हे दोन्ही ग्रह शुभ मानले जातात. या दोन्ही ग्रहांची स्थिती जेव्हा एकमेकांशी खास नातं तयार करते, तेव्हा कुंडलीतल्या ठराविक राशींवर त्याचा चांगला परिणाम होतो असं मानलं जातं. शुक्रवार, १८ सप्टेंबरच्या रात्री साधारण १०:४५ वाजता चंद्र धनु राशीत गेला, तर त्याचवेळी गुरू चंद्राची स्वतःची रास असलेल्या कर्क राशीत आला. म्हणजे दोन्ही ग्रह एकमेकांच्या राशीत गेल्यामुळे गुरू-चंद्र राशी परिवर्तन योग तयार झालाय. या योगाचा प्रभाव काही राशींच्या करिअर, पैसा, शिक्षण आणि पर्सनल लाइफवर पडू शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. कोणत्या राशींना याचा फायदा मिळू शकतो, ते बघूया.
कर्क राशीचा मालक ग्रह चंद्र आहे, त्यामुळे चंद्र-गुरूचा हा राशीबदल कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक अर्थांनी फायद्याचा ठरू शकतो. विरोधकांशी जोडलेल्या गोष्टींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी बरेच दिवस अडकलेलं काम पुन्हा मार्गी लागू शकतं. घरच्यांचाही पाठिंबा मिळेल, विशेषतः माहेरकडचे नातेवाईक आर्थिक मदत किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारे मदत करू शकतात. याचा परिणाम निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आणि कामाच्या परफॉर्मन्सवरही दिसू शकतो.
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि चंद्राची ही युती लाभ आणि सुखसोयींच्या दृष्टीने पॉझिटिव्ह संकेत देऊ शकते. गुरू लाभाच्या घरात तर चंद्र सुखाच्या घरात असणार आहे. बिझनेस करणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेला एखादा नवीन प्रोजेक्ट काही जण सुरू करू शकतात. भावंडांकडून पाठिंबा मिळेल आणि घरातलं वातावरणही सुधारू शकतं.
गुरू हा धनु राशीचा मालक ग्रह आहे, त्यामुळे चंद्रासोबत होणारा त्याचा हा राशीबदल धनु राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय. अचानक पैसे मिळण्याच्या संधी तयार होऊ शकतात. वागण्यात आणि व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसू शकतात. बोलण्याच्या पद्धतीमुळे लोक इम्प्रेस होतील आणि सोशल लेव्हलवर प्रतिष्ठा वाढू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
मीन राशीच्या लोकांसाठीही हा योग फायद्याचा ठरेल. बुद्धिमत्ता, करिअर आणि रखडलेल्या कामांशी जोडलेल्या गोष्टींमध्ये याचा चांगला परिणाम दिसू शकतो. गुरू पंचम स्थानात तर चंद्र दशम स्थानात असणार आहे, त्यामुळे समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. बऱ्याच काळापासून अडकलेली कामं पुढे सरकण्याची संधी मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात संधी मिळू शकते. कुणाला उसने दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.