सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 184 | Moderate 13:08 IST

गोंडपिपरीत अवैध रेती वाहतुकीवर महसूल पथकाची कारवाई, आठ ब्रास रेतीसह ट्रक जप्त

चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावर पहाटे महसूल पथकाने विनापरवाना रेती घेऊन जाणारा ट्रक पकडला. ट्रकमध्ये आठ ब्रास रेती होती.

गोंडपिपरीत अवैध रेती वाहतुकीवर महसूल पथकाची कारवाई, आठ ब्रास रेतीसह ट्रक जप्त छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गोंडपिपरी येथे अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. विनापरवाना रेती घेऊन जाणारा एक ट्रक महसूल पथकाने पकडून जप्त केला. त्या ट्रकमध्ये आठ ब्रास रेती होती. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावर झाली. गोंडपिपरी शहराजवळ असलेल्या फलके ढाब्याजवळ शुक्रवारी, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे चारच्या सुमारास पथकाने हा ट्रक थांबवला. पथक त्यावेळी गस्तीवर होते. शंका आल्यामुळे त्यांनी MH-32 AJ-7772 क्रमांकाचा ट्रक थांबवून त्याची पाहणी केली.

तपासणीत ट्रकमध्ये परवान्याशिवाय नेली जाणारी आठ ब्रास रेती सापडली. पथकाच्या माहितीनुसार, रेती वाहतुकीचा वैध परवाना किंवा कोणतीही कागदपत्रे ट्रकसोबत नव्हती. त्यामुळे महसूल विभागाने ट्रक लगेच जप्त करून ताब्यात घेतला.

या प्रकरणी चौकशी केली असता ट्रकचे मालक वर्धा जिल्ह्यातील जुबेर खान असल्याचे समोर आले. ट्रकचा चालक अमरावती जिल्ह्यातील इरफान शहा असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यात अवैध रेती तस्करांकडून अधूनमधून छुप्या मार्गाने वाहतूक केली जाते. अशा बेकायदा धंद्यांवर आणि तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल प्रशासन तहसीलदार शुभम बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे अलर्ट मोडवर काम करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे ही कारवाई झाली.

ही कारवाई तहसीलदार शुभम बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकातील मंडळ अधिकारी सुकेशनी कांबळे, तलाठी उईके आणि वाहनचालक गौरव मेश्राम यांनी पार पाडली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतूकदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ