मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:33 IST

घुग्गुस येथे कोळसा वाहतुकीचा ट्रक जळून खाक, आग कशी लागली हे अजून स्पष्ट नाही

मुंगोली खाणीतून घुग्गुस रेल्वे सायडिंगकडे कोळसा वाहतूक करणारा कंपनीचा ट्रक २९ सप्टेंबरच्या रात्री जळाला. घुग्गुस पोलीस तपास करत आहेत.

घुग्गुस येथे कोळसा वाहतुकीचा ट्रक जळून खाक, आग कशी लागली हे अजून स्पष्ट नाही
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस परिसरात कोळसा वाहतूक करणारा एक ट्रक २९ सप्टेंबरच्या रात्री जळून खाक झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात चर्चेला तोंड फुटले आहे. ट्रकला आग नेमकी कशी लागली, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

मुंगोली कोळसा खाणीतून घुग्गुस रेल्वे सायडिंगपर्यंत कोळसा नेण्याचे कंत्राट केवीआरआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले आहे. ही खाण यवतमाळ जिल्ह्यात आहे. कंपनीकडे जवळपास २० ट्रक आहेत आणि त्या ट्रकवर बाहेरच्या राज्यातील कामगार चालक म्हणून काम करतात.

२९ सप्टेंबरला रात्री साधारण १०.३० वाजता ट्रक क्रमांक MH-34-CQ-3385 मुंगोली खाणीतून घुग्गुस रेल्वे सायडिंगकडे निघाला. तिथे कोळसा उतरवून तो परत खाणीकडे जात असताना बैरम बाबा मंदिराजवळ अचानक त्याला आग लागली. या आगीत ट्रक जळून खाक झाला आणि कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर वेगवेगळ्या अफवा उडाल्या आहेत. ट्रकचे चालक रमाकांत सिंग गोड यांच्या म्हणण्यानुसार ५ युवकांनी ट्रकची वाट अडवली, त्यावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. मात्र जळालेल्या ट्रकच्या मागे केवीआरआर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे २ ट्रक उभे होते. त्यातील चालक म्हणाले की, असे काही घडले असते तर चालक आमच्याकडे आला असता आणि हल्लेखोरांनी आमचे ट्रकही जाळले असते. पण तसे काही झाले नाही. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ट्रक जळू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे, स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना कोळसा वाहतुकीचे कंत्राट न देता ते बाहेरच्या राज्यातील कंपनीला दिल्याने त्या संतापातून ही घटना घडू शकते, अशी अफवा आणि चर्चा सध्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये सुरू आहे.

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र येथे चालणाऱ्या उद्योगांमध्ये बाहेरच्या कामगारांना रोजगार दिला जात असल्याने स्थानिक बेरोजगारांमध्ये संताप आहे. अशा वातावरणात ही घटना घडली आहे.

या घटनेबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या आहेत, पण तक्रार मिळाल्यावरच घटनेचा खुलासा होणार आहे. कंपनी आज तक्रार दाखल करणार आहे. घुग्गुस पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासानंतरच जाळपोळीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ