मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:20 IST

'सुप्रीम कोर्ट' थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; 'न्यायमूर्ती गणराया' देत आहेत दर्शन, व्हिडिओ व्हायरल

तेलंगणातील वारंगल येथे उभारण्यात आलेल्या सुप्रीम कोर्ट थीमच्या गणेश पंडालाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'सुप्रीम कोर्ट' थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; 'न्यायमूर्ती गणराया' देत आहेत दर्शन, व्हिडिओ व्हायरल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशभरात यंदाही निरनिराळ्या थीमचे भव्य मंडप उभारले जात आहेत. या मंडपांनी भाविकांचे लक्ष तर वेधून घेतले आहेच, शिवाय इंटरनेटवरही ते चांगलेच चर्चेत आहेत. काही ठिकाणी नोटांनी बाप्पाला सजवले जात आहे, तर काही ठिकाणी पाणीपुरीच्या पुरीपासून गणेशमूर्ती साकारली जात आहे. या सगळ्यात आता एक वेगळाच मंडप सोशल मीडियावर लोकप्रिय ठरला आहे, तो म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या थीमवर उभारलेला गणपती पंडाल.

या मंडपाची बाहेरची रचना अगदी सर्वोच्च न्यायालयासारखी दिसते. मंडपात प्रवेश केल्यावर भाविकांना आपण खऱ्याखुऱ्या न्यायालयात आल्यासारखा अनुभव येतो. इतक्या बारकाईने ही रचना उभारण्यात आली आहे की आतील वातावरण एखाद्या खऱ्या कोर्टरूमसारखेच भासते. या पंडालातील गणरायाला थेट न्यायमूर्तींच्या वेशात सजवण्यात आले आहे. खुर्चीवर बसलेल्या या गणेशमूर्तीच्या एका हातात न्यायाधीशांचा हातोडा तर दुसऱ्या हातात न्यायाची तराजू दाखवण्यात आली आहे. न्यायमूर्तींच्या वेशातील गणेशाची अशी मूर्ती याआधी क्वचितच कुणी पाहिली असेल. गणेशाशेजारी मूषकराजही उभा असल्याचे व्हिडिओत दिसते.

मंडपात केवळ गणेशमूर्तीच नाही, तर वकील, पोलीस आणि साक्षीदारांच्या पिंजऱ्याचीही संपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. म्हणजेच कोर्टरूममध्ये जशी रचना असते, अगदी तशीच रचना या पंडालातही उभारण्यात आली आहे. पार्श्वभागी 'यतो धर्मस्ततो जयः' हा जप आणि न्यायाशी संबंधित श्लोकही लिहिलेले दिसतात. मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण पंडाल पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार करण्यात आला आहे. सध्या हा पंडाल इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत असून, भाविक मोठ्या संख्येने 'न्याय गणपती'चे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत.

ANI या वृत्तसंस्थेने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून या पंडालाचा व्हिडिओ शेअर केला असून, तेलंगणातील वारंगल येथे हा 'न्यायमूर्ती गणपती' पर्यावरणपूरक सुप्रीम कोर्ट थीमच्या पंडालात भाविकांना आकर्षित करत असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. श्रद्धा आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ असलेल्या या पंडालातून पर्यावरण जागृतीचा संदेशही दिला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 23.5 हजार व्ह्यूज मिळाले असून, कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सनी आपापली मते नोंदवली आहेत. एका यूजरने लिहिले, "देवाची अशी अवहेलना करु नका." तर दुसऱ्या यूजरने लिहिले, "बाप्पा बोलेल अरे मला आहे तसं राहू द्या." आणखी एका यूजरने प्रश्न उपस्थित केला, "पण गणपतीसोबत हे सर्व प्रयोग करायलाच हवेत का? तो साध्या रुपातच शोभून दिसतो."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ