शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India भारतात परतला, गूगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर मोफत डाऊनलोड

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India भारतात परतला, गूगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर मोफत डाऊनलोड छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

Garena ने आपला लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Free Fire India भारतात 28 ऑक्टोबर 2026 पासून डाऊनलोडसाठी खुला केला आहे. गूगल प्ले स्टोअर आणि एप्पल ॲप स्टोअरवर तो मोफत मिळतो.

मोबाईल गेम खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Garena ने आपला लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Free Fire India भारतात 28 ऑक्टोबर 2026 पासून डाऊनलोडसाठी खुला केला आहे. गूगल प्ले स्टोअर आणि एप्पल ॲप स्टोअर या दोन्हीवर या गेमची लिस्टिंग करण्यात आली असून तो डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध असणार आहे.

गेमच्या आकाराबद्दल सांगायचे तर अँड्रॉईडवर तो 392MB आणि आयफोनवर 1.49GB आहे. भारतातील प्लेअर्ससाठी गेममध्ये खास ईव्हेंट्स आणि विशेष कँपेनही जोडण्यात आले आहेत. त्यात दिवाळी विशेष कँपेनचा समावेश आहे, जे 15 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.

गूगल प्ले स्टोअर किंवा एप्पल ॲप स्टोअरवरून Free Fire India स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करता येतो. अकाऊंट आणि डिव्हाईस सुरक्षित ठेवण्यासाठी थर्ड-पार्टी APK सोर्सचा वापर करू नका, हे लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

डाऊनलोडची पद्धत अशी: सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये गूगल प्ले स्टोअर किंवा एप्पल ॲप स्टोअर उघडा. तिथे गरेना इंटरनॅशनलने सादर केलेला Free Fire India सर्च करा. नंतर डाऊनलोड प्रोसेस सुरू करण्यासाठी 'इंस्टॉल' किंवा 'गेट' या पर्यायावर क्लिक करा. गेम उघडल्यावर वय व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि आपल्या क्रेडेंशियल्सने लॉगिन करून गेम सुरू करा.

Free Fire India हा गरेनाने सादर केलेला बॅटल रॉयल गेम आहे. यात प्लेअर्स एका आइलँडवर उतरतात आणि हत्यारे व महत्त्वाचे सामान गोळा करू शकतात. त्यानंतर इतर प्लेअर्सचा सामना करत अखेरपर्यंत गेममध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न केला जातो. एका मॅचमध्ये जास्तीत जास्त 50 खेळाडू सहभागी होऊ शकतात. गेममध्ये सोलो, डुओ आणि स्क्वॉड असे मोड उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे हा गेम वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोनवर चालण्यासाठी ऑप्टिमाइझ करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय खेळाडूंना त्याचा आनंद घेता येईल.

सुरक्षित आणि जबाबदारीने खेळता यावे यासाठी गरेनाने गेममध्ये काही फीचर्सही जोडली आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्लेअर्ससाठी पॅरेंटल कंसेंट गरजेचे आहे. याशिवाय गेम खेळण्यासाठी काही लिमिटही ठरवण्यात आल्या आहेत. गेमच्या मध्ये ब्रेक घेण्यासाठी रिमाईंडर मिळतात आणि इन-ॲप खरेदीवर खर्चाची लिमिटही सेट करण्यात आली आहे. यामुळे मुलांच्या गेमिंगच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि त्यांना दीर्घकाळ सतत गेम खेळण्यापासून रोखण्यासाठीही मदत होऊ शकते.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ