Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पुरुष एकेरी स्क्वॉशमध्ये अभय सिंगने रौप्यपदक जिंकत भारतासाठी इतिहास रचला, पण सुवर्णपदकाच्या लढतीत मलेशियाच्या एनजी ईन येओकडून त्याला पराभव पत्करावा लागला.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताला स्क्वॉशमध्ये मोठे यश मिळाले. पुरुष एकेरी गटात भारताचा स्टार खेळाडू अभय सिंग याने रौप्यपदक पटकावले. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याचा सामना मलेशियाच्या अव्वल मानांकित खेळाडू एनजी ईन येओशी झाला. ही लढत अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाली, पण अखेर अभयला ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. सेटचे गुण होते ९-११, ५-११ आणि ५-११. या पराभवामुळे सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, तरीही रौप्यपदक जिंकून त्याने भारतासाठी इतिहास घडवला.
सुवर्णपदकाच्या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये अभयने आपली ताकद दाखवत चांगली फाईट दिली आणि एनजी ईन येओला घाम फोडला, पण हा पहिला सेट तो ९-११ ने हरला. दुसऱ्या सेटमध्ये मलेशियन खेळाडूने अभयवर दबाव आणला आणि ११-५ असा सहज विजय मिळवत २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये अभयने जोरदार पुनरागमन करत ४-२ अशी सुरुवातीची आघाडी घेतली. मात्र एनजी ईन येओने लगेच परत खेळात येत ६-५ अशी आघाडी मिळवली आणि शेवटी हा सेट ११-५ ने जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सामना जिंकल्यानंतर ईन येओ भावूक झाला होता, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. या विजयामुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारा खेळाडू ठरला असून, त्याने २०२८ च्या ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली आहे.
अंतिम सामन्यात सुवर्णपदक हुकले असले तरी, संपूर्ण स्पर्धेतील अभयची कामगिरी प्रेरणादायी राहिली. उपांत्य फेरीत त्याने पाकिस्तानच्या मुहम्मद इरफानला सरळ सेटमध्ये ३-० ने हरवले होते. या सामन्यात अभयने आक्रमक सुरुवात करत पहिला गेम ११-३ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये इरफानने चांगली झुंज दिली, पण त्याला यश मिळाले नाही आणि अभयने शानदार खेळ दाखवत हा सेट १२-१० ने जिंकला. तिसरा गेमही अभयने ११-६ ने जिंकत हा मोठा विजय साजरा केला. संपूर्ण सामन्यात अभयचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत होते आणि इरफानला त्याच्यासमोर संधीच मिळाली नाही.
अभय सिंग हा भारताच्या आघाडीच्या स्क्वॉश खेळाडूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत त्याने राष्ट्रीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. पीएसए टूरवर, म्हणजेच व्यावसायिक स्क्वॉश खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये, त्याने अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. यापूर्वीही त्याने आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई सांघिक चॅम्पियनशिप आणि जागतिक सांघिक चॅम्पियनशिप यांसारख्या मानाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच अभय सिंगचे नाव भारतीय स्क्वॉशमधील एक विश्वासार्ह खेळाडू म्हणून घेतले जाते.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.