मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:02 IST

चर्चगेटमध्ये २९ सप्टेंबरला महिलांसाठी खास रोजगार मेळावा, जपानमध्येही नोकरीची संधी

एसएनडीटी महिला विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ अंतर्गत महिलांसाठी विशेष मेळावा होणार असून ३० स्टॉल्स, २० हून अधिक कंपन्या आणि ५ शासकीय महामंडळे यात सहभागी होतील.

चर्चगेटमध्ये २९ सप्टेंबरला महिलांसाठी खास रोजगार मेळावा, जपानमध्येही नोकरीची संधी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मुंबईतील महिलांना रोजगाराच्या विविध संधी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून खास पाऊल उचलण्यात आले आहे. "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ" या मोहिमेअंतर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ परिसरात भव्य महिला विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मेळाव्यात महिलांना थेट उद्योग व आस्थापनांशी जोडणे, त्यांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार आणि परदेशी रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन संपूर्ण राज्यभर ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे.

१० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा तसेच इतर व्यावसायिक कौशल्य असणाऱ्या सर्व पात्र महिला उमेदवार या मेळाव्यात आणि सोबतच्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जाऊन लगेच पूर्व-नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सुनिल पवार, प्रो. हेमलता बागला (अति. कार्य.) आणि कुलगुरू श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी केले आहे.

मेळाव्यात महिला उमेदवारांच्या सोयीसाठी एकूण ३० स्टॉल्स उभारण्यात येणार असून विविध क्षेत्रांतील २० हून अधिक कंपन्या व आस्थापना थेट मुलाखतींद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५ प्रमुख शासकीय महामंडळेही या मेळाव्यात सहभागी होणार असून ती स्वयंरोजगाराच्या संधी, विविध शासकीय योजना, कर्ज सुविधा आणि इतर उपक्रमांची थेट माहिती देतील. यासोबतच विविध कौशल्य प्रशिक्षण योजना व रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती देणारे स्वतंत्र स्टॉल्सही येथे उपलब्ध असतील.

या मेळाव्यातील एक वेगळे आकर्षण म्हणजे जपानमधील रोजगार संधींसाठी खास उभारण्यात आलेला स्टॉल. या स्टॉलवर उमेदवारांना थेट जपानमध्ये नोकरीच्या संधींबाबत तसेच ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार आणि परदेशी रोजगाराच्या इतर संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मुंबई शहर व परिसरातील सेवा तसेच उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांनाही यामुळे आपल्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ थेट निवडण्याची मोठी संधी मिळणार आहे.

मुंबई शहरातील सर्व उद्योजक आणि बेरोजगार महिलांनी या मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ