मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:00 IST

इराणच्या दक्षिणेकडील बंदरांवर निर्बंध, तुर्की सीमेवर ट्रकच्या लांबच लांब रांगा

बंदरांवरील अडथळ्यांमुळे इराणमधील आयातदार आता स्थलमार्गाकडे वळले असून तुर्की सीमेवर किलोमीटरभर ट्रक रांगेत उभे आहेत.

इराणच्या दक्षिणेकडील बंदरांवर निर्बंध, तुर्की सीमेवर ट्रकच्या लांबच लांब रांगा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

२८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेलं युद्ध अजूनही थांबलेलं नाही. इराण अमेरिकेसमोर झुकायला तयार नाही आणि अमेरिकाही इराणसमोर माघार घ्यायला तयार नाही. आत्तापर्यंत या युद्धाला तब्बल २११ दिवस पूर्ण झाले आहेत. याच युद्धामुळे इराणमधील होर्मूझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद पडली आहे, आणि याच सागरी मार्गातून जगातला जवळपास २० टक्के माल ने-आण केला जातो.

युद्ध आणखी पसरलं तसं सौदी विरुद्ध हुती अशीही लढाई सुरू झाली. हुतींनी लाल समुद्रातला दुसरा सागरी मार्ग, म्हणजे बाब अल मंदेबही बंद करून टाकला. होर्मूझ बंद झाल्यावर अमेरिकेने त्या प्रवेशद्वारावरच ब्लॉकेड लावलं आहे.

यामुळे चीन सोडला तर इराणला बाकी कुठल्याही देशासोबत व्यापार करणं अवघड झालं आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारपेठ मंदावली असून महागाईही वाढली आहे. स्वतःला जगाचं पोलिसिंग करणारी ताकद आणि तंत्रज्ञान असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेला मात्र इराणने चांगलंच घाम फोडलं आहे.

तरी या बदलत्या जागतिक परिस्थितीचा अमेरिकेवर मोठा फरक अजून दिसलेला नाही, किंवा फरक पडला असला तरी त्याच्या बातम्या जगभर फारशा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे असं म्हणता येईल की अमेरिका तुपाशी आणि बाकी जग उपाशी अशी परिस्थिती आहे.

दुसरीकडे अमेरिकेने मात्र इराणला चांगलंच टाईट केलं आहे. इराणच्या दक्षिणेकडील बंदरांवर व्यापारासाठी निर्बंध आणि अडथळे निर्माण झाल्यामुळे तिथल्या आयातदारांनी आता मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलमार्गाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे इराण-तुर्की सीमेवर मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी या रांगा किलोमीटरपर्यंत पोहोचल्या आहेत.

इराणच्या परकीय व्यापारासाठी दक्षिणेकडील बंदरं महत्त्वाची मानली जातात. पण निर्बंधांमुळे आयात प्रक्रियेत अडथळे येऊ लागल्यामुळे व्यापाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. तुर्कीमार्गे युरोप आणि इतर बाजारपेठांशी जोडणारे स्थलमार्ग त्यामुळे आता जास्त महत्त्वाचे ठरत आहेत. परिणामी या मार्गावर मालवाहतुकीचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

व्यापाराचा मोठा हिस्सा स्थलमार्गाकडे वळल्यामुळे इराण-तुर्की सीमेवरील कस्टम आणि तपासणी केंद्रांवर वाहतूक कोंडी वाढली आहे. मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगांमुळे चालकांना सीमा ओलांडण्यासाठी बराच वेळ थांबावं लागत आहे. या विलंबाचा थेट परिणाम आयात होणाऱ्या मालाच्या पुरवठा साखळीवर होत आहे.

दक्षिणेकडील बंदरांवरील अडथळ्यांमुळे स्थलमार्गाचा वापर वाढल्याने वाहतूक व्यवस्थेवर आणखी दबाव निर्माण झाला आहे. लांब प्रतीक्षा, कस्टम प्रक्रिया आणि वाढलेलं अंतर यामुळे माल पोहोचवायला लागणारा वेळ आणि खर्च दोन्हीही वाढू शकतो. त्यामुळे निर्बंधांचा परिणाम फक्त बंदरांपुरता मर्यादित न राहता आता इराणच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर दिसून येत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ