एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आता एप्पल आयक्लाउड प्लस, टीव्ही आणि आर्केडचा समावेश
भारती एअरटेलने आपल्या फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये मोठा बदल केला आहे. ९९९ रुपये आणि त्याहून जास्त किमतीच्या एअरटेल फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये आता Apple iCloud+, Apple TV आणि Apple Arcade या तीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी हे प्लॅन्स फक्त मोबाइल कनेक्टिव्हिटीसाठी ओळखले जायचे, पण आता एकाच प्लॅनमध्ये क्लाउड स्टोरेज, मनोरंजन आणि गेमिंग अशा तिन्ही गोष्टी ग्राहकांना मिळणार आहेत.
कंपनीच्या या नव्या ऑफरमुळे ९९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना Appleच्या विस्तारित iCloud+ सुविधेचा फायदा मिळेल. यामध्ये फोटो, फाइल्स, पासवर्ड, कॉन्टॅक्ट्स आणि इतर महत्त्वाचा डिजिटल डेटा सुरक्षित ठेवून तो सिंक करता येतो. त्यामुळे नवा आयफोन किंवा इतर कोणतंही एप्पल डिव्हाइस सेट करताना जुना डेटा बॅकअपमधून सहज घेता येईल.
या अपडेटमधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Apple TV आणि Apple Arcade या दोन सेवा. Apple TVमधून ग्राहकांना एप्पलच्या स्वतःच्या सीरिज आणि सिनेमे पाहायला मिळतील. तर Apple Arcadेमधून विविध गेम्सचा मोठा साठा उपलब्ध होईल. कंपनीने सांगितल्यानुसार, Apple Arcadेवरचे गेम्स कुठल्याही जाहिराती किंवा इन-अॅप खरेदीशिवाय खेळता येतात. म्हणजे या प्लॅनमध्ये आता नेटवर्क कनेक्टिव्हिटीबरोबरच मनोरंजन, गेमिंग आणि क्लाउड स्टोरेज या तिन्ही गोष्टी एकत्र मिळणार आहेत.
एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये तीन जणांच्या कुटुंबासाठी सुविधा दिली जाते. या प्लॅनमध्ये FastLane Technologysह अनलिमिटेड डेटा, स्पॅम प्रोटेक्शन आणि वेगवेगळी एंटरटेनमेंट सबस्क्रिप्शन्स आधीपासूनच मिळत होती. आता त्यात Apple iCloud+, Apple TV आणि Apple Arcade जोडल्यामुळे एकाच पोस्टपेड प्लॅनमधून अनेक डिजिटल सेवा वापरता येणार आहेत.
एप्पल डिव्हाइस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी iCloud+ खासकरून उपयोगी ठरू शकते, कारण फोटो, फाइल्स, पासवर्ड आणि कॉन्टॅक्ट्ससारखी माहिती सुरक्षित स्टोअर करून ती वेगवेगळ्या एप्पल डिव्हाइसवर सिंक करता येते. यामुळे डिजिटल कंटेंट सांभाळणं आणि नव्या डिव्हाइसवर डेटा ट्रान्सफर करणं आधीपेक्षा सोपं होईल.
या नव्या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहक एअरटेल ॲपवरून आपला पोस्टपेड प्लॅन अपग्रेड करू शकतात. याशिवाय जवळच्या एअरटेल स्टोअरमध्ये जाऊनही प्लॅन अपग्रेड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
भारती एअरटेलचे डायरेक्टर, मार्केट ऑप्स अमित त्रिपाठी यांनी सांगितलं की, कंपनी कनेक्टिव्हिटीसोबतच ग्राहकांना मनोरंजन आणि डिजिटल अनुभव एकाच प्लॅनमध्ये देण्यावर भर देत आहे. Apple iCloud+, Apple TV आणि Apple Arcade जोडल्यामुळे एअरटेल फॅमिली पोस्टपेड प्लॅन्समध्ये आणखी सुविधा वाढल्याचं त्यांनी नमूद केलं.
या अपडेटमुळे एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनबद्दल आणि त्यातल्या एप्पल सेवांबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढण्याची शक्यता आहे.