सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:44 IST

दुर्गापूरमध्ये रविवारी दोन अपघात, ट्रकला धडकलेल्या दुचाकीवरील तिघांचा आणि कारमधील दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-19 वर झालेल्या दोन अपघातांत 5 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले.

दुर्गापूरमध्ये रविवारी दोन अपघात, ट्रकला धडकलेल्या दुचाकीवरील तिघांचा आणि कारमधील दोघांचा मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या काळात मोठ्या थाटामाटात दुर्गा पूजा साजरी होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो, त्याचप्रमाणे तिथे दुर्गा पूजेला महत्त्व आहे. अशा वातावरणात शनिवारी रात्री कोलकात्यात झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी दुर्गापूरमध्ये दोन रस्ते अपघात झाले.

पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूरमध्ये रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले. या दोन्ही अपघातांत मिळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात राष्ट्रीय महामार्ग-19 वर घडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आसनसोल-दुर्गापूर पोलीस कमिश्नरेटचे डीसीपी (ईस्ट) रासप्रीत सिंह यांनी सांगितले की, रविवारी सकाळी दुर्गापूरमध्ये झालेल्या दोन्ही अपघातांत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पहिला अपघात दुचाकी आणि ट्रकचा होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन तरुण आणि एक महिला दुचाकीवरून दुर्गापूरच्या भिरिंगी चौकातून पियालाच्या दिशेने निघाले होते. वेगात असलेल्या दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकी पुढे चाललेल्या ट्रकवर मागून जोरात आदळली.

धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघेही उडून वेगवेगळ्या दिशांना फेकले गेले. गंभीर जखमी झालेल्या तिघांना स्थानिकांनी दुर्गापूरच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

स्थानिकांनी दावा केला आहे की दुचाकीचा वेग प्रचंड होता. धडकेनंतर दुचाकीचे पुढचे चाक ट्रकच्या मागच्या बाजूला पूर्णपणे अडकून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने दुचाकी आणि ट्रक वेगळे केले. अपघाताच्या वेळी दुचाकीचा वेग किती होता, याचा पोलीस तपास करत आहेत. दुचाकी चालवणाऱ्याने मद्यपान केले होते का, हेही तपासले जात आहे.

दुसऱ्या घटनेत एका कारने बसला मागून जोरात धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग-19 वरून दुर्गापूरहून आसनसोलला जाताना अंदाल क्रॉसिंग सर्व्हिस रोडमध्ये शिरत असताना हा अपघात झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये चालकासह 7 जण होते. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 5 जण गंभीर जखमी आहेत. सर्वांवर बिधाननगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, कारमधील प्रवासी एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतत होते. पोलिसांनी दोन्ही अपघातांचा तपास सुरू केला आहे. कारने बसला नेमकी कशी धडक दिली आणि चालकाचा गाडीवरील ताबा कसा सुटला, हे अधिकारी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ