दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

देऊळगाव राजात दिवाळीपूर्वी गरजू कुटुंबांना आनंदाचा शिधा किटचे वाटप

देऊळगाव राजात दिवाळीपूर्वी गरजू कुटुंबांना आनंदाचा शिधा किटचे वाटप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
समाज PT24 टीम

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या देऊळगाव राजा शहरातील गरजू कुटुंबांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला किराणा किट देण्यात आले. पाच संस्थांनी मिळून हा उपक्रम राबवला.

देऊळगाव राजा शहरातील गरजू आणि गरीब लोकांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला आनंदाचा शिधा वाटण्यात आला. विरंगुळा भवन येथे हे वाटप झाले, तसेच काही गरजू लोकांच्या घरी जाऊनही शिधा पोहोचवण्यात आला.

देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय, जेष्ठ नागरिक संघटना आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देऊळगाव राजा यांनी मिळून हा उपक्रम राबवला.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अनेक गरजू कुटुंबे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा कुटुंबांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलावा, म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. आनंदाचा शिधा म्हणून किराणा किट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, त्यांनाही सणासुदीचा आनंद अनुभवता यावा, हा या उपक्रमामागचा उद्देश होता.

गरजू व्यक्तींना किटचे वाटप या मान्यवरांच्या हस्ते झाले: सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्याध्यक्ष मधुकर शेळके, सचिव गोविंदराव बोरकर, प्रा. अशोक डोईफोडे, प्रा. विजय रायमूल, प्रकाश अहिरे, अरुण सपाटे, घनश्याम भंडारे, मधुकरराव धुळे, पंडितराव पाथरकर, शांतीलाल निरफळे, सुशील हनुमंते, प्रा. विनायक कुळकर्णी, प्रा. अविनाश राजे जाधव, बाबुलाल शिवरकर आणि शिवाजी धुळे.

#नागपूर#समाज#PT24#Society#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ