दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळी पहाटच्या मंचावरून शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा, सुगी परिवाराचा निर्णय

दिवाळी पहाटच्या मंचावरून शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा, सुगी परिवाराचा निर्णय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

दादरमध्ये दरवर्षी दिवाळी पहाट आयोजित करणाऱ्या सुगी परिवाराने शेतकऱ्यांसाठी एक कोटीपेक्षा अधिक रुपये देण्याची घोषणा केली. मकरंद अनासपुरे यांच्याकडे 'नाम फाउंडेशन'साठी रक्कम देण्यात आली.

दिवाळी हा उत्साह, आनंद आणि चैतन्याचा सण आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या सणात आनंद दिसतो. फराळ, फटाके, रांगोळी आणि आकाश कंदील यांच्यासोबत दिवाळी पहाट ही गोष्टही दिवाळीत हमखास असते. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातून सर्वांची दिवाळी संगीतमय व्हावी, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

यंदाही अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम झाले. मात्र राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती इतकी भीषण असताना आपण इकडे उत्साहात दिवाळीचा आनंद साजरा करावा का, अशी चर्चाही सुरू होती.

दरवर्षी दादरमध्ये दिवाळी पहाट आयोजित करणाऱ्या सुगी परिवाराने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाची घोषणा वेगळ्या कार्यक्रमात नव्हे, तर दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातच करण्यात आली.

शेतकऱ्यांसाठी एक कोटीपेक्षा अधिक रुपये देण्याची घोषणा झाली. ही रक्कम मंचावरच धनादेशाच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे यांच्याकडे 'नाम फाउंडेशन'साठी देण्यात आली. याशिवाय आणखी 51 लाख रुपयांची रक्कम पारिजात फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आली.

यंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची यादी भरगच्च होती. राहुल देशपांडे यांच्या गायनाने परिसर मंत्रमुग्ध झाला. संकर्षण कऱ्हाडे आणि अभि मुंडे यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले. स्वप्नील जोशी हेही मंचावर उपस्थित होते. शिवाय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम बहारदार झाला.

एवढ्या मोठ्या नावांमध्येही सुगी परिवाराचे सर्वाधिक कौतुक होत आहे ते शेतकऱ्यांसाठी दिलेल्या रकमेमुळे. या निर्णयामुळे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे आभारही मानले जात आहेत.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ