BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही
बीएसएनएलने फ्रीडम 2.0 या नावाने खास प्रमोशनल ऑफर आणली आहे, जी 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास प्रमोशनल ऑफर लाँच केली आहे. नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी ही ऑफर आणली असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीने याबाबतची पोस्ट त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे. बीएसएनएल आपल्या यूजर्ससाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणि ऑफर्स घेऊन येत असते. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन्स स्वस्त असतात आणि त्यात मिळणारे फायदेही जास्त असतात, त्यामुळे ग्राहक बीएसएनएलकडे आकर्षित होत आहेत.
एक्सवरील पोस्टमध्ये बीएसएनएल फ्रीडम 2.0 या ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. या ऑफरची किंमत फक्त 1 रुपया इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणजे केवळ 1 रुपयात यूजर्सना फ्री सिमसोबतच डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळणार आहेत. ही ऑफर लिमिटेड टाईमसाठी उपलब्ध असल्याने ज्यांना 1 रुपयात नवं सिम घ्यायचं आहे त्यांना घाई करावी लागणार आहे, कारण मुदत संपल्यानंतर ही ऑफर मिळणार नाही.
बीएसएनएलच्या पोस्टमधील माहितीनुसार, फ्रीडम 2.0 ऑफरची किंमत 1 रुपया असून यात ग्राहकांना फ्री सिम दिलं जाणार आहे. यासोबतच डेली 1GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही या ऑफरमध्ये समाविष्ट आहे. 1 रुपयात मिळणाऱ्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 दिवसांची असणार आहे, म्हणजे हे सगळे फायदे ग्राहकांना 24 दिवसांच्या कालावधीसाठी मिळत राहणार आहेत.
म्हणजेच यूजर्सना 24 दिवसांपर्यंत रोज 1GB हाय स्पीड डेटा आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येणार आहे. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगमुळे यूजर्सना त्यांच्या जवळच्या लोकांशी मनसोक्त बोलता येणार आहे. या 24 दिवसांच्या काळात यूजर्सना डेटा, कॉलिंग किंवा एसएमएससाठी वेगळे पैसे खर्च करावे लागणार नाहीत, कारण हे सगळं फक्त 1 रुपयाच्या या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.
बीएसएनएलने एक्सवरील पोस्टमध्ये सांगितलं आहे की, फ्रीडम 2.0 ऑफर 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. ज्या ग्राहकांना या प्रमोशनल ऑफरचा फायदा घ्यायचा आहे, त्यांनी उपलब्धता आणि लागू अटींच्या तपशिलांसाठी 12 ऑक्टोबर 2026 पूर्वी बीएसएनएलशी संपर्क साधावा लागेल. नवीन सिम घ्यायचं आहे आणि कमी किंमतीत मोबाईल कनेक्टिव्हिटी हवी आहे, अशा यूजर्ससाठी कंपनीने ही खास ऑफर आणली आहे.