शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेवीच्या खेळाडूंची बाजी, रिलेसह चार पदकांची कमाई

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेवीच्या खेळाडूंची बाजी, रिलेसह चार पदकांची कमाई छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

बोईसर येथील १७ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेव येथील मिशन लक्षवेध सेंटरच्या खेळाडूंनी दोन सांघिक आणि दोन वैयक्तिक पदके जिंकली.

वाई : बोईसर (जि. पालघर) येथे नुकतीच १७ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मांढरदेव येथील मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशनअंतर्गत चालणाऱ्या मिशन लक्षवेध सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या खेळाडूंनी दोन सांघिक आणि दोन वैयक्तिक अशी एकूण चार पदके मिळवली आणि मांढरदेवीच्या क्रीडा क्षेत्राचे नाव उंचावले.

१७ वर्षांखालील मुलींच्या ४x१०० मीटर रिले संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघात हंसिका तुपे, ज्ञानेश्वरी जाधव, अनुष्का निकम, श्रेया सावंत आणि स्वराली जगदाळे यांचा समावेश होता. तसेच मुलांच्या ४x४०० मीटर रिले संघाने दमदार कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. या संघात हर्षवर्धन पवार, श्रवण गाढवे, विघ्नेश चिकणे, अभय मांढरे आणि श्रेयश बोबडे यांचा समावेश होता.

वैयक्तिक प्रकारातही मांढरदेवच्या खेळाडूंनी पदके मिळवली. अनुष्का निकम हिने ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक मिळवले, तर वैष्णवी डेरे हिने ३००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

हे सर्व खेळाडू न्यू इंग्लिश स्कूल, मांढरदेव आणि किसन वीर महाविद्यालय, वाई येथे शिक्षण घेतात. शिक्षण घेत असतानाच नियमित सरावासाठी त्यांना मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या मिशन लक्षवेध सेंटरमध्ये सकाळी आणि सायंकाळी प्रशिक्षण दिले जाते. क्रीडा प्रशिक्षक राजगुरू कोचळे आणि रेखा कोचळे यांचे मार्गदर्शन या खेळाडूंना लाभत आहे.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले, तर ते राज्यस्तरावरही यश मिळवू शकतात, हे या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मुख्य क्रीडा अधिकारी संस्कृती मोरे, काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धर्माजी मांढरे, सचिव दत्तात्रय मांढरे आणि न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक धोंडराम वाडकर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. टीम वाईचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि व्यापारी वर्ग यांनीही अभिनंदन करून या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#नागपूर#खेल#PT24#Sports#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ