शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
06:14 IST

मोबाईल हिसकावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला प्रवाशांनी चालू ट्रेनच्या खिडकीत लटकवले; व्हिडिओ व्हायरल

मोबाईल हिसकावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला प्रवाशांनी चालू ट्रेनच्या खिडकीत लटकवले; व्हिडिओ व्हायरल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बिहारमधील शिवनारायणपूर रेल्वे स्टेशनवरचा असल्याचे सांगितला जाणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चालू ट्रेनमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला प्रवाशांनी खिडकीतच पकडून ठेवल्याचे या व्हिडिओत दिसते. या घटनेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

देशात चोरीचे प्रमाण वाढत असून आता घरातच नाही तर रेल्वेतही चोरांचा सुळसुळाट वाढला आहे, असे या निमित्ताने म्हटले जात आहे. आरोप असलेल्या व्यक्तीला रंगेहात पकडल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे, असेही सांगितले जाते.

हा व्हिडिओ बिहार राज्यातील शिवनारायणपूर रेल्वे स्टेशनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार, एक व्यक्ती चालू ट्रेनमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र हा प्रयत्न फसला आणि प्रवाशांनी त्याला रंगेहात पकडले. प्रवासी इतके भडकले होते की त्याला सहजासहजी सोडण्यापेक्षा शिक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

प्रवाशांनी खिडकीतूनच त्या व्यक्तीचे दोन्ही हात पकडून ठेवले. त्यावेळी तो ट्रेनच्या बाहेर खिडकीत हात घालून लटकत होता. थोड्या वेळाने ट्रेन सुरू झाली, तरीही प्रवासी त्याचे हात सोडायला तयार नव्हते.

व्हिडिओत तो आपल्या जीवासाठी ओरडताना आणि प्रवाशांना विनवणी करताना दिसतो. ट्रेनचा वेग वाढल्यानंतर प्रवाशांनी त्याचे हात सोडले आणि तो स्टेशनवर जाऊन आदळला. शेवटच्या दृश्यात तो स्टेशनवर पडलेला दिसतो. सुदैवाने तो धावत्या ट्रेनच्या चाकांखाली चिरडला गेला नाही, नाहीतर त्याचा जीव गेला असता.

हा व्हिडिओ @RajuSharmajour1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर यूजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आरोप असलेल्या व्यक्तीची बाजू घेतली, तर काहींनी प्रवाशांचे वागणे योग्य असल्याचे म्हटले आहे.

एका यूजरने लिहिले, "हे बरोबर नाही. चोरीवरून कोणालाही एखाद्या माणसाची हत्या करण्याचा अधिकार नाही. राग येणे स्वाभाविक आहे आणि रागाच्या भरात थोडी मारहाण होऊ शकते, पण हे खूपच जास्त होत आहे. तो ट्रेनच्या चाकांमध्ये अडकून गंभीर जखमी होऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो."

दुसऱ्या यूजरने लिहिले, "आज कर्माने एक्सप्रेसचा वेग पकडला आहे..". आणखी एका यूजरने लिहिले, "खुनी चोरापेक्षा चोर कमी गुन्हेगार असतो".

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ