शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:55 IST

बीएसए गोल्ड स्टार 650 चे दोन नवे स्पेशल एडिशन लाँच, किंमत 3.56 लाखांपासून

क्लासिक लेजेंड्सने बर्मिंगहॅम ब्लू आणि ब्रुकलँड्स ब्लॅक लेगसी हे दोन स्पेशल एडिशन भारतात आणले आहेत. एक्स-शोरूम दिल्ली किंमत 3.56 लाख आणि 3.65 लाख रुपये आहे.

रेट्रो लूक, दमदार इंजिन आणि क्लासिक ब्रिटिश स्टाइल आवडणाऱ्या बाइकप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. क्लासिक लेजेंड्सने बीएसए गोल्ड स्टार 650 चे दोन नवे स्पेशल एडिशन भारतात लाँच केले आहेत. बर्मिंगहॅम ब्लू एडिशन आणि ब्रुकलँड्स ब्लॅक लेगसी एडिशन अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही एडिशनमध्ये खास रंगसंगती आणि प्रीमियम डिझाइन डिटेलिंग देण्यात आले आहे.

किंमतीचा विचार केला तर या मोटरसायकलची एक्स-शोरूम दिल्ली किंमत अनुक्रमे 3.56 लाख रुपये आणि 3.65 लाख रुपये आहे. म्हणजेच बर्मिंगहॅम ब्लू एडिशन 3.56 लाख रुपयांना, तर ब्रुकलँड्स ब्लॅक लेगसी एडिशन 3.65 लाख रुपयांना मिळते.

बर्मिंगहॅम ब्लू एडिशनला गडद निळा रंग देण्यात आला आहे. कंपनीच्या ब्रिटिश वारशाशी जोडलेल्या बर्मिंगहॅम शहराला या रंगसंगतीतून आदरांजली वाहिली आहे. यात खास सिल्व्हर साइड-पॅनल बॅज आणि वेगळा इंजिन फिनिश मिळतो. या एडिशनमध्ये इंजिन आणि सायकल पार्ट्स स्टँडर्ड मॉडेलप्रमाणेच ठेवले आहेत, त्यामुळे मुख्य बदल लूक आणि फिनिशमध्ये दिसतात.

दुसऱ्या एडिशनमध्ये गडद काळ्या रंगासोबत गोल्ड पिनस्ट्राइपिंग, क्रोम फिनिश असलेले फेंडर्स आणि टँकवर क्रोम डिटेलिंग दिले आहे. क्विल्टेड सीटमुळे बाइकला प्रीमियम आणि जुन्या काळातील मोटरसायकलसारखा लूक येतो. ब्रुकलँड्स या ब्रिटिश रेसिंग सर्किटशी बीएसएच्या इतिहासाचा संबंध आहे. 1937 मध्ये रायडर वॉल हँडली यांच्या विक्रमी कामगिरीमुळे गोल्ड स्टार हे नाव प्रसिद्ध झाले होते.

दोन्ही स्पेशल एडिशनमध्ये 652cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 45 bhp पॉवर आणि 55 Nm टॉर्क निर्माण करते. ब्रेम्बो ब्रेक्स, ड्युअल-चॅनल ABS आणि वायर-स्पोक व्हील्स ही वैशिष्ट्येही तशीच कायम ठेवली आहेत. त्यामुळे या बाइकचा रेट्रो रोडस्टर स्वभाव आणि राइडिंग सेटअप बदललेला नाही.

स्टँडर्ड बीएसए गोल्ड स्टार 650 ची किंमत 3.10 लाख ते 3.45 लाख रुपये आहे. त्याच्या तुलनेत नवे स्पेशल एडिशन अधिक महाग आहेत, कारण त्यांची किंमत 3.56 लाख आणि 3.65 लाख रुपये आहे. स्टँडर्ड मॉडेल Highland Green, Insignia Red, Shadow Black, Midnight Black, Dawn Silver आणि Legacy Sheen Silver अशा सहा रंगांमध्ये मिळते.

भारतीय बाजारात या बाइकची स्पर्धा रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 सोबत आहे. क्लासिक स्टाइलसोबत खास रंगसंगती शोधणाऱ्या बाइकप्रेमींचे लक्ष हे नवे एडिशन वेधून घेऊ शकतात.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ