सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
09:14 IST

बंगळुरूत पाचव्या टी 20 ला पावसाचा व्यत्यय, प्रत्येकी 9 ओव्हर्सचा सामना पुन्हा थांबला

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटचा टी 20 सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला आणि नंतर पुन्हा थांबवण्यात आला.

बंगळुरूत पाचव्या टी 20 ला पावसाचा व्यत्यय, प्रत्येकी 9 ओव्हर्सचा सामना पुन्हा थांबला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील शेवटचा, म्हणजेच 5 वा टी 20 सामना खेळवला जात आहे. सामन्यावर आधीपासूनच पावसाचे सावट होते. सामना सुरू होण्याच्या वेळेसच पाऊस पडत असल्याने सुरुवातीला उशीर झाला. अखेर सव्वा नऊ वाजता खेळाला सुरुवात झाली.

पावसामुळे हा सामना प्रत्येकी 9 ओव्हर्सचा खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र खेळ सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस आल्याने सामना थांबवण्यात आला आहे.

भारताकडून फलंदाजीची सुरुवात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात अभिषेक शर्मा केवळ 6 रन्स करून आउट झाला. त्याच्यानंतर इशान किशन खेळायला आला. इशान किशनने 30 रन्सची आक्रमक खेळी केली आणि तो 30 रन्स करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. संजू सॅमसन 16 रन्स करून आउट झाला, तर श्रेयस अय्यर 22 रन्स करून आउट झाला.

आजचा सामना करो या मरो चा असल्याने वेस्ट इंडिजचे गोलंदाज अचूक मारा करताना दिसत होते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्यांच्या कीमो पॉलने अभिषेक शर्माला आउट केले. शमार जोसेफने आक्रमक खेळणाऱ्या इशान किशनला आउट केले. वेस्ट इंडिजने शानदार गोलंदाजी करत 6 ओव्हर्समध्ये भारताचे 4 फलंदाज आउट केले.

हा शेवटचा टी 20 सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या सिरीजमध्ये दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना जो संघ जिंकेल, तो सिरीजही जिंकणार आहे. आता केवळ 9 ओव्हर्सचा सामना होत असल्याने तो अत्यंत चुरशीचा होणार आहे. आउटफील्डही ओली असल्याने तिथे खेळणे सोपे नसणार आहे.

भारतीय संघात श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव आणि नमन धीर यांचा समावेश आहे.

वेस्ट इंडिजच्या संघात शे होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमार जोसेफ, अमीर जांगू, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड आणि शमार स्प्रिंगर हे खेळाडू आहेत.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ