शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:02 IST

२१ बायका असल्याचा दावा करणाऱ्या बांगलादेशी भिकाऱ्याला आठवतात फक्त आठ जणींची नावे

मेरू मियां नावाचा हा भिकारी रोज एका वेगळ्या बायकोला सोबत घेऊन भीक मागायला जातो, असे त्याने व्हिडिओत सांगितले आहे; सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

२१ बायका असल्याचा दावा करणाऱ्या बांगलादेशी भिकाऱ्याला आठवतात फक्त आठ जणींची नावे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बांगलादेशातील एका भिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप फिरत आहे. या व्हिडिओत त्याने आपल्याला २१ बायका असल्याचे सांगितले असून हीच गोष्ट लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांना या दाव्याचे आश्चर्य वाटले आहे.

या व्यक्तीचे नाव मेरू मियां (Meru Mia) असल्याचे सांगितले जाते. तो बांगलादेशचा रहिवासी असून त्याचे वय ३५ वर्षे आहे. भीक मागणे हेच त्याच्या कमाईचे साधन असून त्यातूनच तो आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, असे त्याने सांगितले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळेच त्याची ओळख लोकांना झाली.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याने आतापर्यंत २१ वेळा लग्न केले आहे. इतकी लग्ने कशी झाली, असा प्रश्न साहजिकच अनेकांना पडला. त्याचे उत्तर त्याने व्हिडिओत दिले आहे. मेरू मियांचा दावा आहे की, त्याने स्वतःहून कधीच कोणत्याही महिलेला लग्नाची मागणी घातली नाही. उलट महिलांनीच त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, आणि त्यांचे मन मोडायचे नव्हते म्हणून त्याने कोणालाही नकार दिला नाही. असे करता करता त्याने तब्बल २१ महिलांशी लग्नगाठ बांधली, असे तो सांगतो.

रोजच्या कामाबद्दलही त्याने सांगितले. व्हिडिओतील दाव्यानुसार तो रोज एका बायकोला आपल्यासोबत घेऊन भीक मागायला जातो. म्हणजे दर दिवशी त्याच्यासोबत वेगळी पत्नी असते. भीक मागण्याच्या या कामात त्याला २१ बायकांची मदत होते, असेही त्याचे म्हणणे आहे. त्यातून तो स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे, सगळ्या बायकांची नावे सांगायला सांगितल्यावर त्याला फक्त आठ जणींची नावे लक्षात होती. एकवीस पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या माणसाला केवळ आठ नावे आठवत असल्याची ही गोष्टही इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर झाल्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट्स करून आपले आश्चर्य व्यक्त केले. एका युजरने म्हटले की, "त्याला फक्त त्याच्या ८ फेव्हरेट बायकांची नावे लक्षात आहेत". दुसऱ्या युजरने लिहिले, "इथे तरुणांना एक मिळत नाही आणि भिकाऱ्याला इतक्या बायका कशा मिळाल्या?". आणखी एका युजरने लिहिले, "भाऊ स्वत:ला जेम्स बाॅंड समजत आहे".

या सगळ्या दाव्यांमुळे लोकांचे कुतूहल वाढले आहे. भिकाऱ्याला इतक्या बायका कशा मिळाल्या, याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली असून ही कहाणी पाहणाऱ्या अनेकांना थक्क करत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ