मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:52 IST

सर्व सरकारी बँकांना आता दर शनिवारी सुट्टी, ५ दिवसांचा आठवडा मंजूर

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांसाठी सोमवार ते शुक्रवार असा ५ दिवसांचा आठवडा तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्व सरकारी बँकांना आता दर शनिवारी सुट्टी, ५ दिवसांचा आठवडा मंजूर
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना दर शनिवारी साप्ताहिक सुट्टी (Saturday Off) असणार आहे. मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोमवार ते शुक्रवार असा ५ दिवसांचा आठवडा (5-Day Work Week) लागू करावा आणि शनिवार-रविवार सुट्टी द्यावी, अशी मागणी बँक कर्मचारी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करत होत्या. केंद्र सरकारने ही मागणी मंजूर केल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार ५ दिवसांचा आठवडा तत्काळ प्रभावाने लागू केला जाणार आहे. आतापर्यंत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असायची. ती सुट्टी रद्द करण्यात आली असून आता प्रत्येक शनिवारी बँका बंद राहतील.

५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत (Working Hours) काही मिनिटांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. मात्र या निर्णयामुळे ग्राहकांच्या कामावर परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.

शनिवारी बँकांचे प्रत्यक्ष कामकाज बंद असले, तरी एटीएम (ATM), नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या सर्व डिजिटल सेवा २४ तास सुरळीतपणे सुरू राहतील.

या नव्या नियमामुळे ग्राहकांना बँकेशी संबंधित प्रत्यक्ष कामांचे नियोजन सोमवार ते शुक्रवार याच दिवसांत करावे लागणार आहे. म्हणजेच बँकेत जाऊन करायची कामे आठवड्याच्या पाच दिवसांतच उरकावी लागतील. धनादेश (Cheque Clearance) आणि खात्याशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी आता सोमवारपर्यंत वाट पाहावी लागेल.

या निर्णयाबाबतची अधिक माहिती समोर येत आहे आणि त्यानुसार बातमी पुढे अपडेट केली जाईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ