आयटेलने भारतात गाठला १५ कोटी ग्राहकांचा टप्पा, फीचर फोनमध्ये ३६% वाटा
दहा वर्षांच्या प्रवासात १५ कोटी (१५० दशलक्ष) ग्राहक जोडल्याची घोषणा आयटेलने केली आहे. फोनसोबत टीव्ही आणि होम अप्लायन्सेसमध्येही कंपनीचा विस्तार सुरू आहे.
भारतातील आघाडीच्या व्हॅल्यू-सेगमेंट कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेलने देशात १५ कोटी (१५० दशलक्ष) ग्राहकांचा टप्पा पार केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीचा भारतातील प्रवास दहा वर्षांचा झाला असून, या काळात हा आकडा गाठल्याचे सांगण्यात आले.
छोट्या शहरांतील पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणारे ग्राहक, फीचर फोन सोडून स्मार्टफोनकडे वळणारे लोक आणि घरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर वाढवणारी लाखो भारतीय कुटुंबे, या सगळ्यांच्या आयुष्याचा आयटेल हा अविभाज्य भाग बनला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
बाजारातील स्थानाबद्दल बोलायचे तर, काउंटरपॉइंट रिसर्चनुसार ३६% मार्केट शेअरसह आयटेल हा भारतातील नंबर १ फीचर फोन ब्रँड ठरला आहे. तसेच १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या एकूण फोन सेगमेंटमध्ये ३४% मार्केट शेअरसह हा ब्रँड आघाडीवर आहे.
आयटेलने "मेड टू लास्ट" या संकल्पनेला प्राधान्य दिले आहे. केवळ मोबाईल फोनपुरते न थांबता कंपनीने टीव्ही, होम अप्लायन्सेस, स्पीकर्स आणि अॅक्सेसरीज अशा अनेक श्रेणींमध्ये वेगाने विस्तार केला आहे. ब्रँडच्या टिकाऊपणाचा दाखला म्हणून सिटी ३०० ५जी आणि पॉवर ८० ५जी या फोन्समध्ये आयपी रेटिंग आणि एमआयएल-एसटीडी प्रमाणपत्रांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत.
विक्रीनंतरच्या सेवेबाबतही कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. पात्र मॉडेल्सवर १०० दिवसांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट मिळते. याशिवाय काउंटर-रिप्लेसमेंट कार्यक्रम आहे, तसेच अॅक्वा, टफ आणि केअर या फीचर फोन इनोव्हेशन सीरिजमधूनही ग्राहकांना सहज उपलब्ध होणारी सेवा आणि विश्वासार्हता दिली जात असल्याचे कंपनी सांगते.
आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले, "१५ कोटी ग्राहकांचा टप्पा म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून भारतीय कुटुंबांनी आयटेलवर दाखवलेल्या अखंड विश्वासाचे प्रतीक आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेऊन, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आकांक्षांशी जुळणारे विश्वासार्ह तसेच परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांची ही पावती आहे."
तालापात्रा पुढे म्हणाले, "मोबाईल फोनपासून टीव्ही आणि होम अप्लायन्सेसपर्यंत भारतीय कुटुंबांच्या गरजांशी संबंधित वेगवेगळ्या उत्पादन श्रेणींमध्ये विस्तार करणे हा आमच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिला असून पुढील टप्प्यात भारतभरातील ग्राहकांसाठी अधिक उपयुक्त तंत्रज्ञान आणि उत्तम अनुभव उपलब्ध करून देण्यावर आमचा भर कायम राहील."
सायबरमीडिया रिसर्चच्या अलीकडील अभ्यासात आयटेलने स्मार्टफोन श्रेणीत ०.८६ गुण मिळवून या सेगमेंटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. स्मार्ट डिव्हाइसेस श्रेणीत ०.८८ गुण मिळवून कंपनीने आघाडी घेतली आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार ८५% ग्राहकांनी आयटेलच्या उत्पादनांना उत्तम व्हॅल्यू-फॉर-मनी मानले, ८१% ग्राहकांनी ब्रँडची ओळख मजबुती आणि टिकाऊपणाशी जोडली आणि ७४% ग्राहकांनी आयटेलला अत्यंत विश्वासार्ह ब्रँड मानले.
देशभरात १,००० हून अधिक सर्व्हिस सेंटर्सचे मजबूत नेटवर्क कंपनीकडे आहे. या नेटवर्कच्या जोरावर आगामी काळात स्मार्टफोन्स, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसच्या श्रेणींमध्ये नवीन उत्पादने लाँच करून अधिकाधिक भारतीय कुटुंबांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आयटेलने म्हटले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.