शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
06:15 IST

आरवटच्या जंगलात मध्यरात्री पत्त्यांचा डाव, पोलिसांनी आठ जणांना घेतले ताब्यात

आरवटच्या जंगलात मध्यरात्री पत्त्यांचा डाव, पोलिसांनी आठ जणांना घेतले ताब्यात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर शहर पोलिसांनी आरवट गावाजवळच्या जंगल परिसरात छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळल्याचा आरोप या आठ जणांवर आहे. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरवट गावाजवळच्या जंगल परिसरात हा सगळा प्रकार घडला.

शहरात अवैध जुगाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरूच ठेवली असून, त्याच मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई झाली. मध्यरात्रीच्या सुमारास ५२ पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम मिळून एकूण ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्याच वेळी आरवट गावाजवळच्या जंगल परिसरात काही जण जमले असून दिव्याच्या उजेडात पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आहेत, अशी गुप्त माहिती खबऱ्यामार्फत पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष आरवट गावाच्या शेतशिवारात आणि जंगल परिसरात छापा टाकला. अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जुगारींना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले.

पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे प्रकाश पुरुषोत्तम करमरकर (वय ३९), प्रफुल रूपचंद गिरडकर (वय २८), अक्षय टिकाराम धामंगे (वय ३०), देवानंद श्यामराव गिरडकर (वय ५८), नरसिंग पोचम मंथन (वय ४२), संदीप नथ्थुजी करमरकर (वय ३६), फिरोज हजरत अली सय्यद (वय ४२) आणि राहुल रमेश चांदेकर (वय २६) अशी सांगितली. हे सर्व जण चंद्रपूर येथील अंचलेश्वर वार्डात राहणारे आहेत.

घटनास्थळाची तसेच आरोपींची अंगझडती घेतली असता, डावावर हारजीतचा खेळ खेळताना मिळालेले १ हजार ५०० रुपये रोख, ५२ तासपत्ते आणि एक जुना वापरता टॉर्च पोलिसांना सापडला. याशिवाय सर्व आरोपींच्या अंगझडतीतून मिळालेली रोख रक्कम धरून एकूण ९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपिल प्रकाश घुगे यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तू भिकादास कोलते करीत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ