बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:31 IST

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत AI आणि VFX मधून साकारले देवीचे रूप

नवरात्रोत्सवाच्या विशेष भागात तुळजाभवानीचे तेजस्वी रूप प्रेक्षकांना दिसणार आहे. हे रूप तयार करण्यासाठी टीमला तीन दिवस लागले.

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत AI आणि VFX मधून साकारले देवीचे रूप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' या लोकप्रिय मालिकेत सध्या नवनवीन घडामोडी सुरू आहेत. बालशौर्याचा नवा प्रवास दाखवणारी 'तुळजाची बालसेना' आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवरात्रोत्सवाच्या विशेष भागात आई तुळजाभवानी आपल्या भक्तांना धैर्य, एकजूट आणि संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देताना दिसणार आहे. यंदा AI आणि VFX तंत्रज्ञानाच्या मदतीने देवीचे दिव्य, तेजस्वी आणि भव्य रूप उभे करण्यात आले आहे, हे या भागाचे वैशिष्ट्य आहे.

कथेत असुरिकेशी झालेल्या संघर्षात पद्मावर हल्ला झाल्यानंतर बालटोळी घाबरली आहे. 'असुरांशी लढणं आपलं काम नाही,' असं म्हणत ही बालसेना हतबल झालेली दिसते. महादेवांच्या लीलेने गुहेत बंदिस्त असलेली असुरिका मात्र ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे पुन्हा प्रकट झाली आहे. त्यामुळे बालरूपातील तुळजाई आणि तिच्या बालसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

असुरिकेने रचलेल्या मायावी लीलेत भव्य मायावी महाल, कपटी मायाजाळ आणि दैवी शक्तींचा थरार पाहायला मिळणार आहे. या संकटाचा सामना करताना तुळजाई आणि तिची बालसेना कोणती युक्ती लढवणार, याची उत्सुकता आहे. अत्याधुनिक VFX तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेला हा कथाभाग प्रेक्षकांना पौराणिक विश्वाचा भव्य अनुभव देणार आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रेक्षकांना मालिकेत आई तुळजाभवानीचे तेजस्वी आणि अलौकिक रूप पाहायला मिळेल. पारंपरिक आभूषणांनी सजलेली देवी आणि तिच्या हातातील शंख, कमळ, गदा, त्रिशूळ, तलवार व सुदर्शन चक्र यांची भव्यता या सादरीकरणातून ठळकपणे दाखवण्यात आली आहे.

प्रत्यक्ष चित्रीकरणाला AI तंत्रज्ञानाची जोड देऊन देवीचे रूप तयार करण्यात आले आहे. दिव्य प्रकाशकिरणांनी उजळलेली आणि प्रसन्न मुद्रेची देवीची प्रतिमा पाहताना प्रेक्षक जणू प्रत्यक्ष गाभाऱ्यात उभे राहून दर्शन घेत आहेत, असा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.

मालिकेचे VFX दिग्दर्शक प्रदीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली VFX आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सादरीकरण तयार झाले. देवीच्या रूपातील बारकावे आणि तिच्या आयुधांची भव्यता ३६० अंशांतून दाखवण्यासाठी टीमला एकूण तीन दिवस लागले.

AI तंत्रज्ञान प्रत्येक वेळी नवीन आणि वेगळी प्रतिमा तयार करत असल्याने देवीच्या रूपात एकसंधता राखणे आणि मूळ दैवी भाव कायम ठेवणे हे टीमसमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी प्रत्यक्ष चित्रीकरण, पारंपरिक 3D तंत्रज्ञान, VFX आणि AI यांचा एकत्रित वापर करण्यात आला.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या मालिकेत भक्ती, बालशौर्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम पाहायला मिळणार आहे. 'आई तुळजाभवानी' ही मालिका रात्री ८.५० वाजता, फक्त कलर्स मराठीवर दाखवली जाते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ