आयटेलचा सिटी ३०० ५जी स्मार्टफोन बाजारात, किंमत १४,९९९ रुपये
आयटेलने १२० हर्ट्झ डिस्प्ले, ५००० एमएएच बॅटरी आणि १० ५जी बँड्सचा सपोर्ट असलेला सिटी ३०० ५जी हा फोन १४,९९९ रुपयांत लॉन्च केला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आयटेल कंपनीने आज आयटेल सिटी ३०० ५जी हा नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेलने हा फोन तरुण आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवून तयार केला आहे. त्याची किंमत १४,९९९ रुपये आहे.
परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दिवसभर चालणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्स नसलेले सॉफ्टवेअर देण्याचा या फोनचा प्रयत्न आहे. फीचर्सने भरलेला, पण बजेटमध्ये बसणारा फोन शोधणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो, असं कंपनीचं म्हणणं आहे.
फोनमध्ये ६.६७-इंच एचडी+ १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आणि २.५डी ग्लास डिझाइन आहे. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग अधिक स्मूथ होतं आणि स्क्रीनवरील हालचाली सहज दिसतात. व्हिडिओ पाहणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा हलकेफुलके गेम खेळणं त्यामुळे सोपं होतं. फक्त ८.४एमएम जाडीच्या बॉडीमुळे फोनला आकर्षक आणि प्रीमियम लूक मिळतो. पहिल्यांदाच साध्या फोनवरून अपग्रेड करणाऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फोनसारखा व्ह्यूइंग अनुभव मिळतो.
फोनमध्ये टी८२०० ऑक्टा-कोर ६एनएम ५जी प्रोसेसर आहे, त्यामुळे रोजच्या कामांसाठी विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो. अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन एनआरसीए तंत्रज्ञानासह १० ५जी बँड्सना सपोर्ट करतो. ४जीबी रॅम व्हेरिएंट अॅप्स वापरणं, व्हिडिओ कॉल करणं आणि कंटेंट स्ट्रीम करणं अशा रोजच्या कामांसाठी तयार केला आहे. अल्ट्रालिंक फ्री कॉलिंगची सुविधाही यात आहे.
दैनंदिन वापर लक्षात घेऊन ५००० एमएएच बॅटरी दिली आहे. ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी ती उपयोगी ठरते. फोनमध्ये टाईप-सी चार्जिंगचा सपोर्ट असून बॉक्समध्ये १० व्हाट्स चार्जर मिळतो. फोटोग्राफीसाठी १३एमपी ऑटोफोकस रिअर कॅमेरा, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ८एमपी फ्रंट कॅमेरा आहे.
अँड्रॉइड १६ गो एडिशनवर चालणारा हा फोन हलका आणि स्मूथ वापराचा अनुभव देण्यासाठी तयार केला आहे. फोन पटकन अनलॉक करण्यासाठी बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे, तसंच फेस अनलॉकचीही सुविधा आहे. डार्क रुबी, मिस्ट बेज आणि बोल्ड इंडिगो या तीन रंगांत तो उपलब्ध आहे.
लॉन्चबद्दल बोलताना आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तलापात्रा म्हणाले, "टियर ३ ते टियर ५ शहरांमध्ये ५जी कनेक्टिव्हिटीची मागणी वेगाने वाढत आहे. मात्र, मर्यादित बजेटमुळे किंवा कमी किमतीच्या फोनमध्ये डिझाइन आणि स्क्रीनच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागेल, या भीतीमुळे अनेक तरुण ग्राहकांना ५जी अजूनही आवाक्याबाहेर वाटतं."
तलापात्रा पुढे म्हणाले, "आयटेल सिटी ३०० ५जी च्या माध्यमातून आम्ही हीच अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. या फोनमध्ये आम्ही प्रीमियम १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले, खऱ्या अर्थाने वेगवान ५जी आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी दिली आहे. दिसायला आणि वापरायला हा फोन आपल्या किमतीच्या श्रेणीपेक्षा अधिक प्रीमियम वाटतो. ग्राहकांना कोणतीही तडजोड न करता ५जीचा फायदा मिळावा, हा यामागचा उद्देश आहे."